Allu Arjun जितकं मानधन घेतो, तितकी रक्कम आपल्या स्वप्नातही येत नसेल; पाहा तो कमवतो तरी किती

आजही त्याच्या गाण्यांवर सोशल मीडियावर रिल्स बनवले जातात. 

Updated: Sep 8, 2022, 03:59 PM IST
Allu Arjun जितकं मानधन घेतो, तितकी रक्कम आपल्या स्वप्नातही येत नसेल; पाहा तो कमवतो तरी किती title=

Allu arjun Net Worth: अल्लू अर्जून (Allu Arjun) हा अभिनेता आता सगळीकडेच चांगलाच लोकप्रिय झाला आहे. पुष्पा या चित्रपटाच्या यशानंतर अल्लू अर्जूनचा भाव कोण वाढला आहे. आज घराघरातील प्रत्येक प्रेक्षक अल्लूचा चाहता झाला आहे. त्याच्या डान्स स्टेप पासून ते त्याच्या अभिनयापर्यंत तो संपुर्ण देशात फेमस झाला आहे. आजही त्याच्या गाण्यांवर सोशल मीडियावर रिल्स बनवले जातात. (south indian superstar allu arjun earns 2 crore rupees per month bollywood actor salman khan hits back)

अल्लूचा लवकरच पुष्पा 2 (Pushpa 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे तेव्हा सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात अल्लूसोबत कोण अभिनेत्री दिसणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

परंतु तुम्हाला माहितीये का की देशभर फेमस झालेला हा अभिनेता कोट्यावधी संपत्तीचा मालक असून दर महिन्याला हा अभिनेता लाखो नाही तर करोडोच्या घरात कमाई करतो. अल्लू अर्जूनच्या नावावर महागड्या गाड्या, बंगले आणि मोठमोठ्या प्रॉपर्टीज आहेत. 

एका चित्रपटासाठी घेतो इतके रूपये? 
आज अल्लू अर्जून एका चित्रपटासाठी 125 कोटी रुपये घेतो. त्यामुळे त्याची फी सलमान खानच्या (Salman Khan) बरोबरीची झाली आहे. त्याने अक्षय कुमारला (Akshay Kumar) मागे टाकले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती 350 कोटी रुपये आहे. याशिवाय अल्लू अर्जुन ब्रँड एंडोर्समेंटसह अनेक गोष्टींमधून पैसे कमावतो.

मीडिया रिपोर्टनूसार अल्लू अर्जुनने 'पुष्पा: द राइज'साठी (Pusha the rise) 32 कोटी रुपये घेतले होते तसेच आता 'पुष्पा: द रुल'साठी 100 कोटी फी घेत आहे अशी माहिती समोर आली आहे. 

हा आहे अल्लूचा महिन्याचा पगार...
अल्लू अर्जुन एका महिन्यात दोन कोटी रुपये कमावतो. त्याची वार्षिक कमाई 24 कोटी आहे. याशिवाय अल्लू अर्जुन हा अनेक लोकप्रिय ब्रँडचा प्रसिद्ध चेहरा आहे. अल्लू अर्जुन यासाठी 4 कोटी रुपये घेतो. 

इतर कमाई काय आहे?
याशिवाय अल्लू अर्जुनने हैदराबादस्थित हेल्थकेअरमध्येही पैसे गुंतवले आहेत. हे वैद्यकीय ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. अल्लू अर्जुनचे घर हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये आहे जे शहरातील सर्वात पॉश क्षेत्र मानले जाते. घराच्या आत खूप सुंदर इंटीरियर घडले आहे. तसेच तिथे एक खाजगी पूल आहे. 

अल्लू अर्जुनचा 100 कोटी रुपयांचा आठ हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधलेला बंगला बाहेरूनही अतिशय प्रेक्षणीय दिसतो. याशिवाय अल्लू अर्जुनने मुंबईत टू बीएचके अपार्टमेंट खरेदी केले आहे.

अल्लू अर्जुनच्या घराच्या गॅरेजमध्ये एकापेक्षा जास्त कार आहेत. यामध्ये रेंज रोव्हर इवोग (range rover evoque), हमर एच2 (hummer h 2), व्होल्वो XC90 T8 एक्सलन्स (Volvo XC90 T8 excellence) मर्सिडीज GLE 350d (Mercedes GLE 350d), जुगार एक्स जे एल (Jaguar XJ L) आणि बीएमडब्ल्यू एक्स एम स्पॉर्ट (BMW X6 M Sport) यांचा समावेश आहे.

अल्लू अर्जूनकडे खाजगी जेट (Private jet) देखील आहे. अनेकदा अल्लू अर्जुन आपल्या कुटुंबासोबत यात प्रवास करतो. अल्लू अर्जुनची पर्सनल व्हॅनिटी व्हॅन (personal vanity) द फाल्कन (the Falcon) देखील आहे ज्याची किंमत 7 कोटी रुपये आहे.