सुपरस्टार Rajnikanth घेतात प्रत्येक सिनेमासाठी 'इतकं' मानधन, त्यांच्याकडे असणाऱ्या संपत्तीचा अंदाज तुम्हाला येणार नाही...

 पण तुम्हाला माहितीये का की ते किती मानधन घेतात? 

Updated: Aug 24, 2022, 09:42 PM IST
सुपरस्टार Rajnikanth घेतात प्रत्येक सिनेमासाठी 'इतकं' मानधन, त्यांच्याकडे असणाऱ्या संपत्तीचा अंदाज तुम्हाला येणार नाही...  title=

South Indian Superstar Rajnikath Net Worth : दाक्षिणात्त्य सुपरस्टार रजनीकांत हे भारतीय सिनेसृष्टीतीलही एक मोठे नावं आहे. त्यांनी आत्तापर्यंत सर्वात मोठे बीग बिजेट सिनेमे केले आहेत त्याचसोबत त्यांचे सिनेमे हे बॉक्स ऑफिसवरही सुपरहिट ठरले आहेत. त्यामुळे इतक्या वर्षात सलग हिटवर हिट सिनेमे देणारे रजनीकांत हे चित्रसृष्टीतील अभिनयाचे देव आहेत. 

ज्या चित्रपटात रजनीकांत असतील तो चित्रपट हिट ठरलाच म्हणून समजा असं गणित रजनीकांत यांच्या बाबतीत नेहमीच ठरलेलं आहे. रोबोट, लिंगा, शिवाजी द बॉस आणि 2.0 असे बॉक्स ऑफिसवरील एकाहून एक हिट चित्रपट त्यांनी दिले आहेत. साऊथ इंडियन इंडस्ट्रीतील ते सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आहेत. पण तुम्हाला माहितीये का की ते किती मानधन घेतात? 

समोर आलेल्या माहितीनुसार रजनीकांत त्यांच्या प्रत्येक चित्रपटासाठी सुमारे 50 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम घेतात. रजनीकांत यांची एकूण संपत्ती 365 कोटी रुपये आहे. समोर आलेल्या माहितीनुसार रजनीकांत यांनी 100 ते 120 कोटी रुपयांची गुंतवणूकही केली आहे.

रजनीकांत यांचे चेन्नईमध्ये एक अतिशय आलिशान घर आहे. कोट्यवधींच्या त्यांच्या या घरात त्यांच्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. रजनीकांत यांनी त्यांच्या घरात काही भव्यदिव्य वस्तूही बसवून घेतल्या आहेत. 

समोर आलेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांच्याकडे इतर स्टार्सप्रमाणे गाड्यांचे फार मोठे कलेक्शन नाही. त्याच्याकडे रेंज रोव्हर, बेंटले तसेच टोयोटा इनोव्हा यांचा समावेश आहे.

अलीकडेच त्याच्या आगामी 'जेलर' या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. पोस्टर अतिशय दमदार असून चाहत्यांना ते खूप आवडले आहे.