भावाच्या लग्नातील कधी न पाहिलेले सिद्धार्थचे खास फोटो; गळ्यात हार घालत धरला ठेका

भावाच्या लग्नात आनंदात वावरतोय सिद्धार्थ; पाहा फोटो  

Updated: Sep 23, 2021, 11:12 AM IST
भावाच्या लग्नातील कधी न पाहिलेले सिद्धार्थचे खास फोटो; गळ्यात हार घालत धरला ठेका

मुंबई : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने वयाच्या चाळीसाव्या वर्षी जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्याच्या अचानक जाण्यामुळे त्याच्या चाहत्यांना, कुटुंबाला आणि गर्लफ्रेंड शेहनाज गिलला मोठा धक्का बसला आहे. 2 सप्टेंबरला सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनानंतर रोज त्याचे जुने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आता त्याच्या भावनाच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियवर तुफान व्हायरल होत आहेत.

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने 'बिग बॉस 13' सिझन आपल्या नावावर केलं. त्यानंतर 'खतरो के खिलाडी'मध्ये देखील त्याने विजय मिळवला. फक्त रियालिटी शो नाही तर सिद्धार्थने अनेक मालिकांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली. 'बालिका वधू' मालिकेच्या माध्यमातून तो घरा-घरात पोहोचला आणि प्रेक्षकांच्या मनात त्याने घर केलं. चाहत्यांच्या मनात राज्य करणाऱ्या सिद्धार्थने अखेर जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

12 डिसेंबर 1980 रोजी जन्मलेला सिद्धार्थ आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आला. एका मॉडेलच्या रूपात त्याने करियरला सुरूवात केली. त्यानंतर 2004 साली त्याने अभिनयात पदार्पण केलं. 2008 रोजी त्याने 'बाबुल का आंगन छूटे' या मालिकेत दिसला. पण सिद्धार्थला लोकप्रियता 'बालिका वधू' मालिकेच्या माध्यमातून मिळाली.