श्रीदेवी: एक दिवसाचा खर्च २५ लाख, मानधनासाठी आकारायची १ कोटी शुल्क

 या लक्षावधी खर्चाची चर्चा मात्र बॉलिवूड वर्तुळात चांगलीच रंगलेली असे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 25, 2018, 03:26 PM IST
श्रीदेवी: एक दिवसाचा खर्च २५ लाख, मानधनासाठी आकारायची १ कोटी शुल्क title=

मुंबई : बॉलिवूडसारख्या अनिश्चिततेच्या क्षेत्रात स्वत:चा दबदबा कायम राखणे ही तशी मुळीच सोपी गोष्ट नाही. पण, श्रीदेवींनी ती साध्य केली. खरे तर, बॉलिवूडमध्ये पुरूष कलाकारांची नेहमीच मक्तेदारी राहिली आहे. पण, श्रीदेवींनी त्याला पहिल्यांदा आव्हान दिले आणि त्या बॉलिवूडमध्ये अभिनयासाठी १ कोटी मानधन घेणाऱ्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या. पण, असे असले तरी, स्वत:ला मेंटेनही तशाच करत. त्यासाठी त्यांचा खर्चही तितकाच होता. असे सांगतात की, स्वत:ला मेंटेन करण्यासाठी त्या एक दिवसासाठी तब्बल २५ लाख रूपये खर्च करत असत. यात सत्यता किती हे त्यांनाच माहिती पण, या लक्षावधी खर्चाची चर्चा मात्र बॉलिवूड वर्तुळात चांगलीच रंगलेली असे.

अमिताभ इतके मानधन घेण्यासाठी संघर्ष

विशेष असे की, मानधन घेण्यासाठी त्या विशेष दक्ष असत. एकदा तर त्यांनी बॉलिवूडचा शेहेनशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपटात काम करण्यासाठी निर्मात्याकडे समान मानधन मागितले होते. तो काळ पाहता एखाद्या अभिनेत्रीकडून अशा पद्धतीची मागणी होणे हे धाडसाचे होते. पण, ती धमक केवळ श्रीदेवींकडेच होती. जी त्यांनी दाखवली. आपले आयुष्य श्रीदेवी अत्यंत खुलेपणे जगल्या.

कपडे, पर्स आणि चप्पलची किंमत लाको रूपये

प्रसारमाध्यमांतून आलेल्या बातम्यांनुसार, श्रीदेवी आपल्या सौंदर्यावरही तितकाच खर्च करत असत. सांगितले जाते की, त्या महागडी सौंदर्य प्रसाधने खरेदी करत. ज्याची किंमत काही हजारांमध्ये असे. ब्यूटी क्लिनिकमध्ये जाऊन त्या आपल्या त्वचेवरही अनेक महागडे उपचार करत असत. श्रीदेवींचे कपडे, चप्पल आणि पर्स यांची किंमत काही लाखांमध्ये असे. त्या अनेकदा विदेशात फिरायला जात असत. अशीही चर्चा होती की, त्यांचा खर्च इतका होता की, तो न पेलल्याने बोनी कपूर यांना नोकरी करावी लागली. त्यांच्यावर प्रचंड खर्चही झाला.

२०१२मध्ये केले पुनरागमन

श्रीदेवींनी हिंदीसोबतच तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळी चित्रपटातही काम कले आहे. २०१२ मध्ये इंग्लिश-विंग्लिश चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी पुनरागमन केले होते. २०१३मध्ये त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन गौरविण्यात आले होते.