SS Rajamouli Says He Likes Ravan More Than Lord Ram : 'बाहुबली' या चित्रपटातून दिग्दर्शक एसएस राजामौली हे संपूर्ण जगात पोहोचले. बाहुबलीनंतर राजामौली यांच्या आरआरआरनं देखील सगळ्यांची मने जिंकली. या चित्रपटानं एका नवा रेकॉर्ड त्यांच्या नावी केला. अशात नेटफ्लिक्सनं राजामौली यांच्यावर एक डॉक्युमेंट्री तयार केली आहे. ज्यामुळे ते चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्यावर बनवण्यात आलेल्या या डॉक्युमेंट्रीचं नाव 'मॉडर्न मास्टर्स: एसएस राजामौली' आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये काही व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या मुलाखतीत राजामौली यांनी असं काही सांगितलं आहे ज्यामुळे ते चर्चेत आले आहेत.
दिग्दर्शक राजामौली यांनी नुकतीच लोकप्रिय पत्रकार अनुपमा चोप्रा यांना मुलाखत दिली होती या मुलाखतीत त्यांनी म्हटलं की त्यांना राम पेक्षा जास्त रावन आवडतो. राजामौली यांनी सांगितलं की 'आपण लहान असताना आपल्याला शिकवण्यात आलं की कौरव वाईट होते आणि पांडव हे चांगले होते. त्याचप्रमाणे पुस्तकांमध्ये आपण वाचलं की रावण वाईट होतो आणि राम चांगले आहेत. पण जसे जसे तुम्ही मोठे होतात, तुम्ही याविषयी अधिक वाचता, तर कळत की त्याला समजणं इतकं सोपं नाही. मला श्रीराम यांच्या पेक्षा रावण आवडतो. ते एक विलक्षण पात्र आहे. तो खूप क्लिष्ट आहे. मला आमचे खलनायक त्याप्रमाणे अधिक शक्तिशाली झालेले पाहायचे आहे. त्यांना पराभूत करणं हे सगळ्यात कठीण काम असायला हवं.'
हेही वाचा : अभिषेक बच्चनच्या लग्नानंतर अमिताभ यांनी संपूर्ण कुटुंबाला दिलं होतं हे वचन, ऐश्वर्याच्या नावावर... मात्र आजही अपूर्ण...
राजामौली यांच्यावर असलेल्या 'मॉडर्न मास्टर्स: एसएस राजामौली' या डॉक्यूमेन्ट्रीमध्ये त्यांचा आतापर्यंतचा चित्रपटसृष्टीतील प्रवास खूप चांगल्या पद्धतीनं दाखवण्यात आला आहे. त्यात दाखवण्यात आलं आहे की कशा प्रकारे त्यांनी त्याच्या चित्रपटाच्या मदतीनं संपूर्ण जगात स्वत: चं नाव कमावलं. त्यांनी राजामौली यांच्या संबंधीत असलेल्या, त्यांच्यासोबत काम केलेल्या लोकांना भेटून त्यांना राजामौली यांच्याविषयी काय वाटतं याविषयी विचारलं आणि त्या सगळ्या क्लिप एकत्र करत त्यांनी ही डॉक्युमेंट्री बनवली आहे. राजामौली यांच्या या डॉक्यूमेन्ट्रीमध्ये त्यांचं कुटुंब दाक्षिणात्य अभिनेता प्रभास, राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि राणा डग्गुबाती आहेत. त्याशिवाय बॉलिवूडता लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर देखील आहे. त्यानंतर अवतार हा चित्रपट बनवणारे जेम्स कॅमरून देखील या डॉक्युमेन्ट्रीमध्ये दिसत आहेत.
ENG
(1 ov) 2/0 (112.3 ov) 387
|
VS |
IND
387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
WI
225(70.3 ov)
|
VS |
AUS
16/1(9 ov)
|
Full Scorecard → |
GER
93/2(6.3 ov)
|
VS |
MAW
|
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(14.5 ov) 72
|
VS |
BRN
76/0(6.5 ov)
|
Bahrain beat Malawi by 10 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.