SSR Case : वर्षभरात सुशांत नव्हे, तर 'या' व्यक्तीशी रियाचा फोनवरुन जास्त संवाद

रियाच्या फोनमधून मिळालेली ही माहिती आणि ...

Updated: Aug 7, 2020, 05:05 PM IST
SSR Case : वर्षभरात सुशांत नव्हे, तर 'या' व्यक्तीशी रियाचा फोनवरुन जास्त संवाद
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत‌ सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रिया‌ चक्रवर्ती ही 'ईडी'समक्ष हजर होताच इथं तिच्याबाबतची आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. ही माहिती होती मागील वर्षभरात रियानं नेमका कोणाशी आणि कितीवेळा संवाद साधला, याबाबची. अर्थातच रियाच्या फोन क़ॉल्स संदर्भातली. 

दर दिवसाआड सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणातील एक नवी माहिती समोर येत आहे. प्रत्येक नव्या माहितीसह रियाच्या अ़डचणींमध्येही वाढ होताना दिसत आहे. मुख्य म्हणजे आता हाती लागलेल्या रियाच्या फोनकॉल्ससंदर्भातील माहितीमुळं अनेकांना धक्काच बसत आहे. यामागची कारणंही तशीच आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार मागील वर्षभरामध्ये रियाने तिच्या वडिलांशी ११९२ वेळा संवाद साधला. तर, तिचा भाऊ शोविक याच्याशी १०६९ वेळा संवाद साधला. सुशांतशी रियाचा अवघ्या १४५ वेळाच संवाद होऊ शकला. तर, सॅम्युअल मिरांडाशी तिनं जवळपास २८७ वेळा संवाद साधला. इथं लक्ष देण्याजोगी बाब अशी, की रियानं सुशांतपेक्षाही सॅम्युअलशी जास्त वेळा संवाद साधला आहे. 

श्रुती मोदी हिच्याशी रिया गेल्या वर्षभरात ७९१ वेळा संवाद साधत होती. सिद्धार्थ पिथानी याच्याशी तिनं १०० वेळा बोलणं केलं. दिपेश सावंतशीही तिची ४१ वेळा चर्चा झाली, चॅटिंगही झालं. सुशांतच्या बहिणीशी म्हणजेच राणीशी रियाचं ४ वेळा बोलणं झालं होतं. 

साधारण गेल्या वर्षभराच्या काळात आपले मार्गदर्शक म्हणवणाऱ्या महेश भट्ट यांच्याशी रियानं १६ वेळा संवाद साधला होता. फोनच्या माध्यमातून तिनं उदय सिंह गौरी यांच्याशी २२ वेळा तर, अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्याशी तिनं २३ वेळा संवाद साधला होता. 

रियाच्या फोनमधून मिळालेली ही माहिती आणि तिनं संपर्क साधलेल्या किंवा तिच्याशी संपर्क साधलेल्या व्यक्तींची नावं पाहता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीमध्ये आता या माहितीनं कोणतं नवं वळण मिळतं किंवा कोणता खुलासा होतो याकडे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.