Drishyam 2 : कलाकारांनी घेतलं इतकं मानधन, रक्कम ऐकूण व्हाल थक्क

Drishyam 2 या चित्रपटात अजयसोबत तब्बू, श्रेया सरन आणि इशिता दत्ता यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

Updated: Nov 18, 2022, 09:31 AM IST
Drishyam 2 : कलाकारांनी घेतलं इतकं मानधन, रक्कम ऐकूण व्हाल थक्क title=

मुंबई : अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) 'दृश्यम 2' ( Drishyam 2 ) चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा पहिला भाग 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. सस्पेन्स थ्रिलर पटकथा असलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. 7 वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन हे अभिषेक पाठक यांनी केलं आहे. 'दृश्यम' ला मिळालेल्या यशानंतर कलाकरांनी 'दृश्यम 2' साठी किती मानधन घेतलं असा प्रश्न अनेकांना आहे. चला तर जाणून घेऊया अजय ते तब्बू (Tabu) कलाकारांनी चित्रपटासाठी किती मानधन घेतलं. 

जाणून घ्या कलाकारांनी किती मानधन घेतलं आहे.

रिपोर्ट्सनुसार, अजयनं या चित्रपटासाठी 30 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. त्याचसोबत तब्बूनं या चित्रपटासाठी 3.5 कोटी रुपये मानधन म्हणून घेतले. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री श्रेया सरननं (Shriya Saran) या चित्रपटासाठी 2 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्नानं (Akshay Khanna) देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तर त्यानं या चित्रपटासाठी 2.5 कोटी मानधन घेतलं आहे. अभिनेत्री ईशिता दत्तानं या चित्रपटात अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली. ही भूमिका साकारण्यासाठी ईशितानं 1.2 कोटी फी घेतली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Janhvi Kapoor च्या बाथरुमला अजून लॉक का नाही? श्रीदेवी यांना 'या' गोष्टीची होती भीती

'दृश्यम 2' चित्रपटात अजयसोबत तब्बू, श्रेया सरन आणि इशिता दत्ता यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेत पाठक यांनी केलं आहे. 'दृश्यम'च्या पहिल्या भागाचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होतं. त्याचं 2020 मध्ये निधन झालं. 'दृश्यम 2' या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. (Drishyam 2 ajay devgn tabu shriya saran akshay Khanna took this much fees for movie) 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x