साऊथचा सर्वात महागडा व्हिलन, या सिनेमात सलमानला देणार टक्कर

साऊथ सिने इंडस्ट्रीतील अभिनेता सुदीप हा नुकताच ४४ वर्षांचा झाला. सुदीप हा सिनेमातील हिरोच्या भूमिकेपेक्षा व्हिलनच्या भूमिकांमुळे अधिक ओळखला जातो. सध्या एका सिनेमासाठी सुदीप साधारण ६ कोटी रूपये घेतो.

Updated: Sep 5, 2017, 04:43 PM IST
साऊथचा सर्वात महागडा व्हिलन, या सिनेमात सलमानला देणार टक्कर title=

मुंबई : साऊथ सिने इंडस्ट्रीतील अभिनेता सुदीप हा नुकताच ४४ वर्षांचा झाला. सुदीप हा सिनेमातील हिरोच्या भूमिकेपेक्षा व्हिलनच्या भूमिकांमुळे अधिक ओळखला जातो. सध्या एका सिनेमासाठी सुदीप साधारण ६ कोटी रूपये घेतो.

प्रकाश राज हे एका सिनेमासाठी २ कोटी रूपये घेतात. आता सुदीप सलमान खानच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात सुदीप पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेतील व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान आणि सुदीप यांच्यात अनेक अ‍ॅक्शन सीन्सही असणार आहेत. 

घटस्फोटानंतर पत्नीला दिले १९ कोटी -

सुदीपने २००१ मध्ये प्रिया राधाकृष्णनसोबत लग्न केले. दोघांची पहिली भेट बंगळुरूमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांनी लग्न केले होते. लग्नाच्या तीन वर्षांनंतर २००४ मध्ये प्रियाने एका मुलीला जन्म दिला. काही वर्षातच दोघांमध्ये झालेल्या वादामुळे त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर सुदीपने पत्नीला पोटगी म्हणून १९ कोटी रूपये दिले होते. त्याची मुलगी सान्वी आई प्रियासोबत राहते. 

अ‍ॅक्टिंगसोबत गायक आणि इंजिनिअर आहे सुदीप -

सुदीपने मुंबईच्या रोशन तनेजा अ‍ॅक्टिंग स्कूलमधून अभिनयाचं ट्रेनिंग घेतलं आहे. त्यासोबतच त्याच्याकडे इंडस्ट्रिअल अ‍ॅन्ड प्रॉडक्शन इंजिनिअरींगची डिग्री आहे. तसेच, सुदीप गायकही आहे. त्याने अनेक हिट गाणी गायली आहेत. 

कन्नडा सिनेमातून करिअरची सुरूवात -

सुदीपने १९९७ मध्ये कन्नडा ‘थय्यवा’ या सिनेमातून करिअरला सुरूवात केली होती. आता तो एका प्रॉडक्शन कंपनीचा मालक आहे. इतकेच नाहीतर त्याने काही सिनेमांचं दिग्दर्शन सुद्धा केलं आहे.  

हिंदी सिनेमातही काम -

‘टायगर जिंदा है’ या सिनेमात काम करण्याआधी सुदीपने ‘फूंक’, ‘रण’ आणि ‘रक्त चरित्र’ या सिनेमातही काम केलं आहे. त्याचा ‘मक्खी’ हा सिनेमा खूप गाजला होता.