मुंबई : बॉलीवूडमध्ये अभिनेत्रींमधील मैत्री क्वचितच पाहायला मिळते, पण आता इंडस्ट्रीत बरेच बदलत होत आहेत. अनेक स्टार किड्सची मैत्री आजकाल सततचर्चेत दिसून येते.
सारा अली खान आणि जान्हवी कपूरच्या मैत्रीनंतर स्टार किड्स सुहाना खान आणि अनन्या पांडे यांची मैत्री खूप गाजत आहे. दरम्यान, सुहानाची एक पोस्ट चर्चेत आली, ज्यामध्ये एका गोष्टीवर ती नाराजी व्यक्त करताना दिसली.
सुहाना खानची नाराजी तिची बेस्ट फ्रेण्ड अनन्या पांडेबद्दल दिसून आली आहे. नुकतच अनन्या पांडेची धाकटी बहीण रईसाने तिचा 18 वा वाढदिवस साजरा केला.
यावेळी अनन्याने तिच्या बहिणीसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघे डिनर करताना दिसत आहेत.
मात्र, अनन्याचा हा फोटो पाहून सुहाना खान भडकली आहे. अनन्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती बहिणीसोबतचे हे क्षण एन्जॉय करताना दिसत आहेत. अनन्याने रईसासोबत डिनर पार्टीची एक झलक शेअर केली असताना सुहानाही तिथे होती.
पण अनन्याने सुहानाला या फोटोमधून क्रॉप केले आणि तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.सुहानाला अनन्याची हीच गोष्ट आवडली नाही.
त्याचवेळी सुहानानेही यावर कमेंट करत 'मला क्रॉप केल्याबद्दल धन्यवाद' असे लिहिले. यानंतर सुहानाने आणखी एक कमेंट लिहिली, 'काय रे...' साहजिकच सुहाना अनन्याच्या या कृतीवर नाराज झाल्याचं दिसून येत आहे.
अनन्याच्या या कृतीमुळे नेटकऱ्यांनी देखील मैत्री फक्त दिखावा असल्याचं बोललं आहे. डिनर डेटवर एकत्र दिसणाऱ्य़ा दोघींमधील हा संवाद सगळ्यांनाच आश्चर्यचकीत करणार ठरत आहे.