सुलोचना दीदींचा लाडका लाडू

दीदींकडून लाडूचे भरभरून कौतुक  

Updated: Jan 2, 2020, 10:25 PM IST
सुलोचना दीदींचा लाडका लाडू title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे अनेक चाहते आहेत, मात्र त्या 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या मोठ्या फॅन आहेत. विशेष करुन लाडू म्हणजेच राजवीर त्यांचा सर्वात आवडता कलाकार आहे.  मुंबईत सुलोचना दीदींच्या घरी जाऊन राणादा-अंजली आणि लाडू म्हणजेच राजवीरने नुकतीच त्यांची भेट घेतली. झी २४ तासने घेतलेल्या मुलाखतील त्यांच्या गप्पा रंगल्या. 

खुद्द दीदींनी लाडूला आमंत्रित केले. त्यामुळे 'तुझ्यात जीव रंगला'ची टीम त्यांच्या भेटीसाठी मुंबईत आली. वर्षाची सुरूवात अतिशय उत्तम झाल्याचा आनंद कलाकारांच्या डोळ्यात स्पष्ट झळकत होता. यावेळेस लाडूने दीदींकडे बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. 

तेव्हा दीदींने क्षणाचाही विलंब न करता लाडूची इच्छा पूर्ण करण्यासाठी बिग बींना फोन करू. त्यानंतर त्यांची वेळ घेवू आणि त्यांना भेटायला जावू असे आश्वासन लाडक्या लाडूला दिले. त्याचप्रमाणे लाडूने कलाकार म्हणून दीदींकडून सल्ला देखील मागितला. 

तेव्हा दीदींनी 'तुम्ही मला नवीन काय आहे ते मला सांगा त्यानंतर जूनी चित्रपटसृष्टी कशी होती ते मी सांगेन.' अशाप्रकारे जून्या आणि नवीन विचारांची आदान-प्रदान याठिकाणी झाली.  

यावेळेस दीदींना भेटण्यासाठी 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचे कलाकार हार्दिक जोशी, अक्षया देवधर, राजवीर आदी कलाकार उपस्थित होते.