तब्बल 128 सेक्स वर्कर्ससाठी 'हा' अभिनेता ठरला मसीहा, इतकी वर्षे करत असलेला कामाचा अखेर केला खुलासा

128 सेक्स वर्कर्सना 'या' अभिनेत्यानं कसं वाचवलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे, जाणून घ्या अभिनेत्यानं नक्की काय केलं. 

Updated: Dec 30, 2022, 04:17 PM IST
तब्बल 128 सेक्स वर्कर्ससाठी 'हा' अभिनेता ठरला मसीहा, इतकी वर्षे करत असलेला कामाचा अखेर केला खुलासा  title=

Suniel Shetty Saved 128 Prostitute : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सुनील शेट्टी हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सुनील चाहत्यांच्या संपर्कात राहतो. सुनील शेट्टी हा फक्त चित्रपटांमध्ये सुपरहिरो नाही तर खऱ्या आयुष्यातही सुपरहिरो आहे. सुनील शेट्टीनं बऱ्याच वर्षांपूर्वी एक-दोन नाही तर वेश्या व्यवसाय करणाऱ्या तब्बल 128 मुलींना वाचवून त्यांच्या घरी पोहोचवले होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुनील शेट्टीनं इतकं चांगलं काम केलं मात्र, कोणालाही कळू दिलं नाही. (Prostitution)

128 सेक्स वर्कर्सची केली होती मदत 

कामाठीपुरा येथे 1996 साली सुमारे 450 सेक्स वर्कर्सना वेश्या व्यवसायातून बाहेर काढले होते. दरम्यान, यातील 128 मुली या नेपाळच्या होत्या. मात्र, नेपाळ सरकारनं त्यांना स्विकारण्यास नकार दिला होता. पोलिसांनी या मुलींची कामाठीपुऱ्यातून सुटका तर केली, पण नेपाळ सरकारने या मुलींना देशात आणण्यास नकार दिला होता. या मुलींकडे जन्माचा दाखला किंवा नागरिकत्वाचा कोणताही पुरावा नसल्याचे नेपाळ सरकारने म्हटले होते. त्यामुळे त्या सर्व मुली आपण नेपाळचे नागरिक असल्याचं सिद्ध करू शकल्या नव्हत्या. त्यामुळे त्या मुलींचं आता काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. रिपोर्ट्सनुसार, तेव्हा सुनील शेट्टी त्यांच्या मदतीसाठी पुढे आला आणि त्यानं त्या 128 मुलींना स्वत: च्या पैशांनी नेपाळला जाण्यासाठी फ्लाइट तिकिट काढून दिले. इतकंच काय तर फ्लाइट तिकिटसोबत याची काळजी घेतली की त्या मुली स्वत: च्या घरी सुखरूप पोहोचतील. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रिपोर्ट्सनुसार, सुनील शेट्टीला याविषीयी कोणाशी बोलायचे नव्हते कारण त्यांना असे वाटायचे की ही गोष्ट समोर आली तर त्या मुलींच्या आयुष्यात काही अडचणी येऊ शकतात. याविषयी सुनील शेट्टीनं एका मुलाखतीत सांगितले. या मुलाखतीत याविषयी बोलताना सुनीश शेट्टी यासगळ्याच क्रेडिट देखील घेत नव्हते. त्याचे म्हणणे होते की त्याच्या व्यतिरिक्त यात अनेकांची मेहनत होती. सुनीलनं बॉलिवूड हंगामाला दिलेल्या या मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता. या घटनेवर एक पूर्ण चित्रपट होऊ शकतो. 

हेही वाचा : ... आणि गुगलनं चक्क शायरी केली; Google Maps ची तक्रार कशी सोडवली पाहाच

सुनील शेट्टीने केलेल्या या मदतीबद्दल तब्बल 24 वर्षांनी 2020 मध्ये खुलासा झाला. जेव्हा या मुलींपैकी एक वाचलेल्या चरिमया तमांगनं एका मुलाखतीत याबद्दल माहिती दिली. सुनील शेट्टीनं आपल्यासह अनेक मुलींचे प्राण वाचवले होते, असं तिने सांगितलं होतं. दरम्यान, चारिमया आता एक एनजीओ चालवते, ती वेश्याव्यवसायाला बळी पडलेल्या मुलींच्या हितासाठी काम करते.