प्रसिद्ध कॉमेडी किंगवर आली दूध विकण्याची वेळ; हाती काम नसल्याने करावं लागतं असं काम?

सुनिल ग्रोवरने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

Updated: Jan 9, 2023, 06:18 PM IST
प्रसिद्ध कॉमेडी किंगवर आली दूध विकण्याची वेळ; हाती काम नसल्याने करावं लागतं असं काम? title=

मुंबई : कॉमेडियन (comdedian) आणि अभिनेता सुनिल ग्रोवर (sunil grover) आपल्या फॅन्सचं मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तर दुसरीकडे सुनिल सोशल मीडियावर अशा काही पोस्ट शेअर करतो ज्यामुळे लोकांना हसू आवरता येत नाही. आता सुनिल ग्रोवरने सोशल मीडिया (social media) वर एक नवी पोस्ट शेअर केली आहे जी पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाहीये. 

दूध विकू लागला सुनिल ग्रोवर
सुनिल ग्रोवरने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये आपण पाहू शकतो की, बाईकवर बसलेला अभिनेता दूध विकण्यासाठी निघाला आहे. ठंडीपासून वाचण्यासाठी सुनिलने ठंडीचे कपडे (sweater) ही परिधान केले आहेत. सुनिलने या फोटोत स्वेटर घातल्याचं आपल्याला दिसत आहे. बाईकच्या दोन्ही साईडला दूधाचे कॅन असल्याचं आपल्याला दिसत आहेत. अभिनेत्याने ही पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होऊ लागली आहे. सुनिल ग्रोवरच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुनिल ग्रोवरने ही पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलं की, 'दूध मचाले'. सुनिल ग्रोवरच्या या पोस्टवर फॅन्स फनी रिएक्शन देत आहेत. एका युजर्सने कमेंट करत लिहीलं की, कोणतंच काम छोटं मोठं नसतं सर. तुम्ही विका आम्ही विकत घेतो, तर अजून एकाने लिहीलं, 'तुम्ही हे कोणत्या लाईनमध्ये आलात डॉक्टर साहेब' तर अजून एकाने कमेंट करत लिहीलं की, 'भाई जरा दूधात कमी पाणी मिसळा'

सुनील ग्रोवरचं वर्कफ्रंट
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर, सुनील ग्रोव्हर शेवटचा गुडबाय (goodbye) चित्रपटात दिसला होता, ज्यामध्ये त्याने अमिताभ बच्चन (amitabh bacchan), रश्मिका मंदान्ना (rashmika manddana) आणि नीना गुप्ता (neena gupta) यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. सुनील ग्रोव्हरने पंडितजींची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या कामाचं खूप कौतुकही झालं होते. याआधी 2021 मध्ये सुनील ग्रोव्हरची तांडव (tandav) ही वेब सिरीज रिलीज झाली होती.