सुनील शेट्टीच्या घराची झलक पाहिलीत? अगदी तुमच्या Dream Home सारखीच

सुनील शेट्टीच्या घरातील खास नजराणा, सोशल मीडिया एकच चर्चा 

Updated: Feb 3, 2022, 01:41 PM IST
सुनील शेट्टीच्या घराची झलक पाहिलीत? अगदी तुमच्या Dream Home सारखीच  title=

मुंबई : प्रत्येकाला आपलं घर ही सगळ्या गोष्टींनी संपन्न लागतं. म्हणजे अगदी ऐश्वर्य, सुख आणि समाधान या तिन्ही गोष्टी आपल्या घरी असाव्यात असं प्रत्येकालाच वाटतं. असंच घर आहे अभिनेता सुनील शेट्टी याचं. सुनील शेट्टीने आपल्या खंडाळाच्या घरातील झलक व्हिडीओतून समोर आणली आहे. 

घरात प्रचंड उजेड, खेळती हवा, भरपूर झाडं आणि वेगवेगळ्या आकाराचे दगड या सगळ्यांनी भरलेलं एक सुंदर घर सुनील शेट्टीने बांधलं आहे. 

या घरात सगळ्या सोई-सुविधा तर आहेतच पण सोबत निसर्गाची खूप छान साथ देखील आहे. 

यूट्यूबच्या 'व्हेअर द हार्ट इज' शोच्या एपिसोडमध्ये सुनील शेट्टीने प्रेक्षकांना त्याचे घर दाखवले. या शोमध्ये सेलिब्रिटी त्यांच्या घरातील प्रत्येक कोपरा अन् कोपरा चाहत्यांना दाखवतात. 

 सुनील शेट्टीने त्याचा खंडाळ्यातील राजवाड्यासारखा असलेला बंगला चाहत्यांना दाखवला. प्रथम त्याने आपल्या दिवाणखान्यापासून सुरुवात केली.

या घराच्या दिवाणखान्यापासून डायनिंग, बाल्कनी एरिया, स्विमिंग पूल, बाहेरचे लॉन, बाग असे सर्व काही त्यांनी दाखवले आहे. या घरात त्यांनी एक मिनी थिएटरही बांधले आहे. जिथे अनेक काळ्या रंगाचे रिक्लिनर्स आहेत.

चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टीच्या या आलिशान घराचा एक भाग चित्रपटांसाठी देखील आहे, जिथे त्याच्या चित्रपटांची चित्रे भिंतींवर टांगलेली आहेत, जिथे तो प्रत्येक वेळी बसून ते क्षण जगतो.

या व्हिडिओमध्ये सुनील शेट्टीने सांगितले आहे की, त्याला निसर्ग, झाडे, जंगलाचे वेड आहे आणि त्यामुळेच या घरातील प्रत्येक कोपऱ्यावर त्यांची झलक पाहायला मिळेल.