मुंबई : सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या 'गदर 2' सिनेमाचं शूटिंग सुरू होताच वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. गेल्या 10 दिवसांपासून कांगडामधील पालमपूरच्या भालेड गावात या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. जिथे या दोन स्टार्सशिवाय सिनेमातील बाकीची स्टारकास्ट देखील शूटिंगसाठी आली होती. पण ज्या घरात शूटिंग झालं होतं, आता त्याच घराच्या मालकाने चित्रपटाच्या निर्मात्यांवर पैसे न दिल्याचा आरोप केला आहे.
'गदर 2' चित्रपटाचं शूटिंग भालेड गावातील देश राज शर्मा यांच्या घरी झालं. या घराच्या मालकाने आता निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. 'शूटिंगनंतर कंपनीकडून जे पैसे दिले जाणार होते ते देण्यास कंपनी आता नकार देत आहे' असा आरोप घरमालकाने केला आहे. घरमालकाचा दावा आहे की, 'चित्रपटाच्या शूटिंगसाठी फक्त 3 खोल्या आणि एक हॉल वापरण्यासाठी 11 हजार प्रतिदिन देण्यात येणार होते. मात्र चित्रपटात संपूर्ण घरासह २ कनाल जमीन आणि मोठ्या भावाचं घरही शूटिंगसाठी वापरण्यात आलं होतं.
काय म्हणाले घरातील लोकं
ज्या घरात शूटिंग झालं त्या घरातील लोकांचं म्हणणं आहे की, 'आमची फसवणूक झाली आहे. जी वचनबद्धता केली होती ती पूर्ण झाली नाही. यासोबतच या लोकांचं आवाहन आहे की, 'त्यांच्या घरचं शूट चित्रपटात वापरू नये.' घरमालकाने संपूर्ण बजेट तयार करून नुकसान भरपाईसह 56 लाख रुपयांची फी बिल बनवल्याने हा वाद निर्माण झाला.
'गदर 2' फिल्म 2001 मध्ये आलेली फिल्म 'गदर'चा सीक्वेल आहे. त्यावेळी देखील अमिषा पटेल आणि सनी देओल या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. यावेळीही हेच स्टार्स मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर 'गदर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील सनी देओलने बोललेले संवाद आजही लोकांना खूप आवडतात.