Sunny Leone भारतात खरेदी केलं इतक्या कोटींचं घर, नव्या घराबाबत केला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. यासोबतच ती सोशल मीडिया आणि मुलाखतींच्या माध्यमातून स्वत:बद्दलचे अनेक खुलासे करत असते. सध्या सनी लिओनी तिच्या नवीन घराच्या किंमतीमुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षी तिने पती डॅनियल वेबरसोबत नवीन घर खरेदी केले आहे. ज्याची किंमत आता समोर आली आहे. (Sunny Leone bought a dream house in Mumbai)

Updated: Apr 4, 2022, 04:24 PM IST
Sunny Leone भारतात खरेदी केलं इतक्या कोटींचं घर, नव्या घराबाबत केला खुलासा title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. यासोबतच ती सोशल मीडिया आणि मुलाखतींच्या माध्यमातून स्वत:बद्दलचे अनेक खुलासे करत असते. सध्या सनी लिओनी तिच्या नवीन घराच्या किंमतीमुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षी तिने पती डॅनियल वेबरसोबत नवीन घर खरेदी केले आहे. ज्याची किंमत आता समोर आली आहे. (Sunny Leone bought a dream house in Mumbai)

सनी लिओनीने नुकत्याच एका इंग्रजी वेबसाइटशी संवाद साधताना याबाबत माहिती दिली. आपल्या फिल्मी करिअर पासून ते वैयक्तीक आयुष्यातील अनेक गोष्टीवर तिने वक्तव्य केले. आपल्या नवीन घराबद्दल बोलताना सनी लिओनी म्हणाली, 'येथे घर घेण्याचा आमचा भावनिक निर्णय होता. भारत हे आपले मुख्य घर आहे जिथे आपण आपला बहुतेक वेळ घालवतो. आम्हाला तीन मुले आहेत आणि आम्हाला असे वाटले की आम्ही फक्त एका अपार्टमेंटमधून दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये स्थलांतर करून त्यांना योग्य आधार देऊ शकत नाही.

अभिनेत्री पुढे म्हणाली, 'आम्हाला आमच्या मुलांना अशी जागा द्यायची होती की त्यांना ती आवडेल. जर तुम्ही आमच्या घरी आलात तर तुम्हाला दिसेल की ते अमेरिकन स्टाईलमध्ये बनवलेले आहे. म्हणूनच आम्ही ते अशा प्रकारे बनवले आहे की जेव्हा आम्ही त्यात येतो तेव्हा ते सुंदर दिसते. आता आपल्यावरही गोष्टी कायमस्वरूपी करण्याची वेळ आली आहे. माझी मुले देखील नवीन घरात या वेळेचा पुरेपूर आनंद घेत आहेत कारण त्यांना त्यांच्या बाईक चालवायला आणि बागेत खेळायला पुरेशी जागा मिळत आहे.

सनी लिओन पुढे म्हणाली, 'स्विमिंग पूलसह इतर अनेक सुविधा आहेत ज्यावर काम केले जात आहे. हे पूर्ण सर्व्हिस अपार्टमेंट आहे. यात मला माझ्या मुलांची काळजी करण्याची गरज नाही. विशेष म्हणजे सनी लिओनीच्या नवीन घराची किंमत जवळपास 16 कोटी रुपये आहे. त्यांचे नवीन घर तीन बेडरूमचे भव्य पेंटहाउस आहे.

अलीकडेच ती अनामिका (Anamika) या वेबसिरीजमध्ये दिसली होती. वेब सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेयरवर ती रिलीज झाली. या मालिकेत सनी लिओनीने खूप वेगळी भूमिका साकारली आहे. अनामिका या वेब सीरिजमध्ये तिने एका गुप्तहेराची भूमिका साकारली आहे, सनी लिओनी या अॅक्शन थ्रिलर वेब सीरिजमध्ये स्टंट करताना दिसली आहे. अनामिका ही वेब सिरीज प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी दिग्दर्शित केली आहे.