रक्तानं माखलेल्या अवस्थेत दिसली Sunny Leone, डोळ्यांत प्रचंड राग... म्हणाली, आता बदला हेच ध्येय!

आपल्या जबरजस्त हॉट अंदाजासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सनी लियोनी सध्या एका पोस्टमुळे चर्चेत आहेत. 

Updated: Aug 9, 2021, 02:39 PM IST
रक्तानं माखलेल्या अवस्थेत दिसली Sunny Leone, डोळ्यांत प्रचंड राग... म्हणाली, आता बदला हेच ध्येय!  title=

मुंबई : आपल्या जबरजस्त हॉट अंदाजासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सनी लियोनी सध्या एका पोस्टमुळे चर्चेत आहेत. सनीचा आगामी चित्रपट 'शीरो' च्या एका पोस्टनं सोशलमीडिया वापरकर्त्यांना हैराण केलं आहे. सनी या फोटोमध्ये रक्तानं माखलेल्या अवस्थेत दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड राग आहे.सनीचं हे रुप पाहून चाहते बुचकळ्यात पडले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सनीने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात ती रक्ताने माखलेली दिसतेय. डोळ्यांमध्ये प्रचंड राग दिसतोय. सनीचा हा अवतार येणाऱ्या शीरो चित्रपटात दिसणार आहे. 

सनी आपल्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध असली तरी तिच्या अभिनयाचंही कौतुक भारतीयांनी केलं आहे. सनीच्या शीरो चित्रपटातील रिलिज झालेल्या पोस्टरवर ज्या प्रकारे एक्सप्रेशन आहे. त्याचंही सोशलमीडियावर कौतुक होत आहे. 'सूड माझं जीवन आहे. माझ्या पहिल्या तामिळ चित्रपटाचा फर्स्ट लूक दाखवत आहे #Shero, असं सनीने म्हटलं आहे.

सनीने जिस्म 2 चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये कामाला सुरूवात केली. सनी लवकरच विक्रम भट्टची एक्शन वेब सीरिज 'अनामिका' मध्ये देखील दिसणार आहे.