'मेरा पिया घर आया' गाण्यावर आता सनी लिओनीचे ठुमके, माधुरी दीक्षित म्हणते...

Madhuri dixit reaction on sunny leone mera piya ghar aaya 2.0​: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'मेरा पिया घर आया 2.0' या गाण्याची. या गाण्यावर सनी लिओनी थिरकणार आहे. हे ओरिजनल गाणं माधुरी दीक्षितवर चित्रित झालं होतं. यावेळी तिनंही या गाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 7, 2023, 07:11 PM IST
'मेरा पिया घर आया' गाण्यावर आता सनी लिओनीचे ठुमके, माधुरी दीक्षित म्हणते...  title=
sunny leone to dance on mera piya ghar aaya 2.0 madhuri dixit reacts

Mera Piya Ghar Aaya 2.0: हल्ली जमाना आहे तो म्हणजे रिमिक्स गाण्यांचा. त्यामुळे अशा गाण्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा ही रंगलेली असते. त्यातून जूनी गाणी परत नव्यानं आणताना त्यांच्यावर अनेकदा टीकाही होताना दिसते. यावर्षी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाची जोरात चर्चा होती. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही चांगलीच कमाई केली होती. हा चित्रपट आता ओटीटीवरही उपलब्ध झाला आहे. या चित्रपटातून एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. परंतु हे गाणं नवीन नव्हतंच. फार जुन्या काळातील, अजरामर असं हे गाणं होतं आणि ते म्हणजे 'झुमका गिरा रे' हे. या गाण्याची जोरदार चर्चा होती. आजही हे गाणं प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.

हेच गाणं रिक्रिएट करून What Jhumka असं नवं गाणं तयार करण्यात आले होते. ज्याची जोरात चर्चा रंगलेली होती. यावर आशा भोसले यांनीही प्रतिक्रिया दिली होती. त्यांनीही काहीशी या गाण्यावर नाराजी व्यक्त केली होती. 

सध्या अशाच एका लोकप्रिय गाण्याची पुन्हा एकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. हे गाणं आहे माधुरी दीक्षितचं 'मेरा पिया घर आया' हे. हे जुनंच पण लोकप्रिय गाणं आपल्याला नव्यानं पाहायला मिळणार आहे. यावेळी या गाण्याची जोरात चर्चा रंगलेली आहे. दोन दिवसांपुर्वी या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे याची जोरात चर्चा रंगलेली आहे. नेटकऱ्यांनी आणि खासकरून माधुरीच्या चाहत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्हाला माहितीये का की या गाण्यावर डान्स करणारी अभिनेत्री कोण आहे जिच्या मनमोहक अदाकारीनं चाहते संपुर्णपणे घायाळ झाले आहेत. ती अभिनेत्री आहे सनी लिओनी.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या सनी लिओनीची यावेळी जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. माधुरी दीक्षितच्या 1,2,3,4 या गाण्याचाही रिमिक्स करण्यात आला होता. ज्याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. त्यावरूनही बरीच टीका झाली होती. आता माधुरीच्या या गाण्यानं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 1995 साली आलेल्या 'याराना' या चित्रपटातून हे गाणं आपल्या भेटीला आले होते. यावेळी या रिमिक्स गाण्यावर आता माधुरी दीक्षितनंही प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, ''या गाण्याचं नवीन व्हर्जन पाहण्याची मी वाट बघत आहे. तुम्हाला माझ्याकडून खूप शुभेच्छा.'' सध्या या व्हिडीओखाली नेटकरीही नानाविध कमेेंट्स करताना दिसत आहेत. हे गाणं उद्या प्रदर्शित होणार आहे.