close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुंबईतली झोपडी ते न्यूयॉर्क फिल्म फेस्ट... सनीचा जोरदार डंका

सनीने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार जिंकला आहे

Updated: May 17, 2019, 02:09 PM IST
मुंबईतली झोपडी ते न्यूयॉर्क फिल्म फेस्ट... सनीचा जोरदार डंका

मुंबई : मुंबईच्या कलिना भागातल्या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या सनी पवार या अकरा वर्षीय मुलाने चित्रपट क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. १९ व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये त्याने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार हा पुरस्कार जिंकला आहे. 'चिप्पा' या चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला. 

पुरस्कार मिळाल्याने सनी अतिशय खूश आहे. आपल्या यशाचं श्रेय त्याने पालकांना दिलंय. तसंच त्याला रजनीकांतप्रमाणे मोठा कलाकार व्हायचं असल्याचंही त्याने म्हटलंय. सनीला बॉलिवुड आणि हॉलिवुडमध्येही काम करायचं असल्याचं त्याने सांगितलंय.

सन्नी कलिना येथील कोचिकोरवेनगर या झोपडपट्टीत राहतो. त्याने यापूर्वी ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक गार्थ डेव्हिस यांच्या २०१६ मधील ‘लायन’ या हॉलिवूडपटातही काम केलं आहे. सनीची 'लायन' चित्रपटातील 'बेस्ट यंग परफॉर्मर' म्हणून ऑस्करसाठी निवड करण्यात आली होती. 'चिप्पा' या चित्रपटात फुटपाथवर राहणाऱ्या आणि जीवनात मोठी स्वप्न पाहणाऱ्या एका लहान मुलाच्या महत्वाकांशेविषयी दाखवण्यात आलं आहे.