SSRSuicideCase : संजय लीला भन्साळी यांची चौकशी होणार

मुंबई पोलिसांनी संजय लीला भन्साळी यांना चौकशीसाठी बोलावलं आहे.

Updated: Jul 2, 2020, 02:32 PM IST
SSRSuicideCase : संजय लीला भन्साळी यांची चौकशी होणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी Sushant Singh Rajput Suicide Case गेल्या काही दिवसांमध्ये अनेकांची चौकशी करण्यात आली. आता मुंबई पोलीस या प्रकरणी दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भन्साळी Sanjay Leela Bhansali यांची चौकशी करणार असल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी संजय लीला भन्साळी यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. राम लीला चित्रपटासाठी सुशांत सिंह राजपूतला कास्ट करण्यात येणार होतं, अशी माहिती मिळत आहे. मात्र त्या नंतर राम लीलामधील रोल रणवीर सिंहला देण्यात आला असल्याची चर्चा आहे. या बदलाबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस संजय लीला भन्साळी यांची चौकशी करणार असल्याचं बोललं जात आहे. 

राम लीला आणि बाजीराव मस्तानी या दोन चित्रपटांबाबत भन्साळी यांची चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे.