मोठ्या पडद्यावर 'खली' ची भूमिका साकारणार हा अभिनेता

महेंद्र सिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटामध्ये काम केल्यानंतर सुशांत सिंग राजपूत आता अजून एका खेळाडूच्या आयुष्यावर आधारित एका चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे.

Updated: Sep 20, 2017, 06:05 PM IST
मोठ्या पडद्यावर 'खली' ची भूमिका साकारणार हा अभिनेता   title=

  मुंबई : महेंद्र सिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटामध्ये काम केल्यानंतर सुशांत सिंग राजपूत आता अजून एका खेळाडूच्या आयुष्यावर आधारित एका चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे.

WWE मध्ये 'खली' या नावाने प्रसिद्ध असलेल्या दलिप सिंग राणा या व्यक्तिरेखेच्या लहापणीचा काळ सुशांतसिंग राजपूत साकारणार आहे.  

 एका प्रसिद्ध वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार ‘द ग्रेट खली’च्या भूमिकेसाठी सुशांतच्या नावाला पसंती देण्यात आली आहे.  खलीच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्यासाठी त्यांच्याकडे परवानगी मागण्यात आली होती. या प्रोजेक्टला खलीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.  निर्मिती संस्थेनेही खलीच्या भूमिकेसाठी सुशांतकडे विचारणा केली आहे. मात्र त्याचे उत्तर अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. 

 अवाढव्य शरीरामुळे ओळखल्या जाणाऱ्या खलीच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी अद्यापही कोणाला ठाऊक नाहीत.  या चित्रपटाच्या माध्यमातून त्या रसिकांसमोर ठेवल्या जातील. पंजाब पोलीसमध्ये खली कार्यरत होता. त्यानंतर फ्रिस्टाईल रेसलिंगमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी खलीने केलेले प्रयत्न आणि संघर्ष चित्रपटाच्या माध्यमातून उलगडण्याचा मानस आहे.