'असा मुलगा जो कोणत्याच ऑडिशनमध्ये अपयशी ठरला नाही'

सुशांतने ‘काय पो छे’ चित्रपटासाठी दिलेल्या ऑडिशनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Updated: Jun 29, 2020, 04:58 PM IST
'असा मुलगा जो कोणत्याच ऑडिशनमध्ये अपयशी ठरला नाही'

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने अगदी कमी कालावधीत आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं. पण १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात गळफास लावून त्याने त्याचा प्रवास संपवलं. या निर्णयामुळे त्याच्या स्वप्नांची यादी मात्र अपुरी राहिली. त्याच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर त्याचे जुने व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत.  सध्या सुशांतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्राने सुशांतचा  एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

या व्हिडिओमध्ये तो ‘काय पो छे’ चित्रपटासाठी ऑडिशन देताना दिसत आहे.  'मुलगा जो कोणत्याच ऑडिशनमध्ये अपयशी होत नाही.  त्याने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर लाखो चाहत्यांच्या मनात घर केलं. ' असं कॅप्शन देखील त्यांनी सुशांतच्या व्हिडिओला दिलं आहे. 

सुशांतचा 'दिल बेचारा' हा अखेरचा चित्रपट  ठरणार आहे. २४ जुलै रोजी  ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'दिल बेचारा'  प्रदर्शित होणार आहे. हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सर्वांसाठी चित्रपट मोफत असणार आहे. चित्रपटात अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत अभिनेत्री संजना सांघी मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. 

'दिल बेचारा' चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश छाब्रा यांनी केले आहे. तसेच हा चित्रपट जॉन ग्रीक यांच्या ‘द फॉल्ट इन आवर स्टार्स’ या पुस्तकावर आधारित असल्याचे म्हटले जाते.