सुशांतची ‘दिल बेचारा’ चित्रपटातून अखेरची झलक

चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.  

Updated: Jul 10, 2020, 03:39 PM IST
सुशांतची ‘दिल बेचारा’ चित्रपटातून  अखेरची झलक

मुंबई : 'दिल बेचारा फ्रेंडझोन का मारा...' मैत्री, प्रेम, एकमेकांबद्दल असलेला आदर इत्यादी गोष्टी अभिनेता सुशांत सिंह राजपूत स्टारर ‘दिल बेचारा’या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. सुशांतच्या शेवटच्या चित्रपटातील पहिलं गाणं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.  अमिताभ भट्टाचार्य लिखीत या गाण्याला ए. आर. रेहमान यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. त्याचप्रमाणे सुशांतसोबत अभिनेत्री संजना संघीची रोमांटीक केमेस्ट्री चाहत्यांना अनुभवता येणार आहे. 

२ मिनिटं सेकंदाच्या या गाण्यामध्ये सुशांत कॉलेजमधल्या कार्यक्रमात परफॉर्म करताना दिसतोय. सुशांतच्या अखेरच्या गाण्याला प्रेक्षकांनी देखील उत्तम प्रतिसाद दिला आहे. चित्रपटात सुशांत मॅनीची भूमिका साकारताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटाच्या ट्रेलरलाही युट्यूबवर भरभरून प्रतिसाद मिळाला.

सुशांतचा 'दिल बेचारा' हा अखेरचा चित्रपट  ठरणार आहे. २४ जुलै रोजी  ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'दिल बेचारा'  प्रदर्शित होणार आहे. हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सर्वांसाठी चित्रपट मोफत असणार आहे. चित्रपटात अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत अभिनेत्री संजना सांघी मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. 

'दिल बेचारा' चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश छाब्रा यांनी केले आहे. तसेच हा चित्रपट जॉन ग्रीक यांच्या ‘द फॉल्ट इन आवर स्टार्स’ या पुस्तकावर आधारित असल्याचे म्हटले जाते. शिवाय या चित्रपटाच्या माध्यमातून सुशांत चाहत्यांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहत्यांच्या मनात चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.