SSR Case: शोविकच्या अटकेनंतर सुशांतच्या बहिणीची प्रतिक्रिया

सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीने ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.   

Updated: Sep 5, 2020, 11:59 AM IST
SSR Case: शोविकच्या अटकेनंतर सुशांतच्या बहिणीची प्रतिक्रिया title=

मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाशी जोडल्या गेलेल्या ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीला अटक केली आहे. नार्कोटिक कंट्रोल ब्युरो(एनसीबी) ने सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडालाही अटक केली आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत ७ लोकांना अटक करण्यात आली आहे. रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीला अटक झाल्यानंतर दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीने ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. 

श्वेता सिंह ट्विट करत म्हणाली की, 'देवा तुझे खूप आभार, खऱ्या मार्गाने सतत आम्हाला मार्गदर्शन करत राहा.' असं म्हणत तिने अनेक हॅशटॅचा देखील वापर केला आहे. #JusticeforSushantSinghRajput#GreatstartNCB@Warriors4SSR#Flag4SSR अशा हॅशटॅचा वापर सुशांतच्या बहिणीने केला आहे.

दरम्यान ड्रग्स प्रकरणी आज रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतसिंह राजपूतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मात्र पहिल्यांदा त्यांची मेडिकल टेस्ट करण्यात येणार असून नंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. झैद, अब्दुल परिहार, कैजान, अब्बास लखानी, करण अरोरा, शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा या तास जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. यापैकी अब्बास लखानी आणि करण खरोरा यांना जामीन मिळाला आहे.