ललित मोदी-सुष्मिता सेनच्या नात्यावर एक्स बॉयफ्रेंडची प्रतिक्रिया, म्हणतोय,मनसोक्त हसा...

16 वर्षाहून लहान असलेला एक्स बॉयफ्रेंड सुष्मिताच्या नात्यावर काय म्हणाला? 

Updated: Jul 15, 2022, 04:30 PM IST
ललित मोदी-सुष्मिता सेनच्या नात्यावर एक्स बॉयफ्रेंडची प्रतिक्रिया, म्हणतोय,मनसोक्त हसा... title=

मुंबई : माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी लग्न केल्याची चर्चा गुरूवारी सोशल मीडियावर रंगली होती. ललित मोदींनी ट्विटरवरुन सुष्मितासोबतचे काही फोटो शेअर केल्यानंतर या चर्चांणा उधाण आले होते. 
मात्र ललित मोदींनी लग्न न केल्याचं स्पष्टीकरण देत ते एकमेकांना डेट करत असल्याची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.त्यात आता सुष्मिता सेनचा 16 वर्षाहुन लहान असलेला एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलने या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे.  

इन्टाग्राम पोस्ट 
रोहमन शॉलने इन्टाग्रामवर एक पोस्ट केली आहेत. या पोस्टमध्ये त्य़ाने सुष्मिताच्या नवीन नात्यावर भाष्य केले आहे. तो म्हणतोय, कोणावरही हसून जर तुम्हाला बरं वाटतं असेल तर हसून घ्या, कारण तो नाही तुम्ही अस्वस्थ आहात, असे त्याने म्हटले. अशी प्रतिक्रिया देऊन त्याने एकप्रकारे सुश्मिताच्या नात्याला पाठींबा दिला आहे. तसेच तिला या नात्यावर सुनावणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.   

दरम्य़ान एका चॅनेलशी बोलताना रोहमन शॉल म्हणाला की, त्यांना आनंदी राहू द्या. प्रेम सुंदर आहे. मला इतके माहित आहे की जर तिने एखाद्याला निवडले असेल तर तो तिच्यासाठी पात्र असल्याचे म्हणत या नात्याला समर्थन दिले.  

कोण आहे हा अभिनेता ? 
रोहमन शॉल एक फ्रीलान्स फॅशन मॉडेल आहे. रोहमनने अभिनयातही हात आजमावला आहे. रोहमन शॉल अॅमेझॉन प्राइमच्या हिअर मी, लव्ह मी या मालिकेतही दिसला आहे. या मालिकेत त्याच्यासोबत शिल्पा शेट्टीही होती. ही मालिका सप्टेंबर 2018 मध्ये रिलीज झाली होती. रोहमनने अनेक फॅशन डिझायनर्ससाठी रॅम्प वॉकही केला आहे. रोहमनने सब्यसाचीसाठी स्टेज पार्टिसिपेंटही केला होता.

ब्रेकअपची पोस्ट 
सुष्मिता सेनने 23 डिसेंबर 2021 रोजी रोहमन शॉलसोबत ब्रेकअपची घोषणा केली. या घटनेला आता ६ महिने उलटले आहेत. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत रोहमनसोबतच्या ब्रेकअपची माहिती दिली होती. त्यावेळी सुष्मिताने पोस्टमध्ये लिहिले होते- 'आम्ही मैत्रीपासून सुरुवात केली आणि नेहमीच मित्र राहू. प्रदीर्घ नात्याचा काळ संपला आहे...पण प्रेम अजूनही आहे, असे तिने म्हटले होते.