'डोन्ट वरी बी हॅप्पी' नाटकात स्वानंदी टिकेकरची एन्ट्री !

मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेलं 'डोन्ट वरी बी हॅप्पी' या नाटकामध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. 

Updated: Apr 23, 2018, 02:32 PM IST
'डोन्ट वरी बी हॅप्पी' नाटकात  स्वानंदी टिकेकरची एन्ट्री !

मुंबई : मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेलं 'डोन्ट वरी बी हॅप्पी' या नाटकामध्ये एक मोठाअ बदल करण्यात आला आहे. या नाटकात प्रमुख भूमिकेत असलेल्या स्पृहा जोशीची एक्झिट झाली आहे. स्पृहा जोशी आणि उमेश कामत या नाटकात प्रमुख भूमिका साकारत आहेत.  

स्वानंदी टिकेकरची एन्ट्री 

स्पृहा जोशीच्या एक्झिटनंतर आता उमेश जोशीसोबत कोण दिसणार हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आला होता. मात्र आता या नाटकामध्ये अभिनेत्री स्वानंदी टिकेकरची एंट्री झाली आहे. 

२७५ वा प्रयोग 

मुंबईतील दीनानाथ नाट्यगृह पार्ले येथे नुकताच "डोण्ट वरी बी हॅप्पी" नाटकाचा २७५ वा प्रयोग झाला. हा स्पृहा जोशीचा "डोण्ट वरी बी हॅप्पी" नाटकाचा शेवटचा प्रयोग होता. त्यानंतर 'स्वानंदी टिकेकर' "डोण्ट वरी बी हॅप्पी" नाटकामध्ये 'प्रणोती प्रधान' ही भूमिका साकारणार आहे. 

स्वानंदी पुन्हा रंगभूमीवर   

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरातून पोहचलेली स्वानंदी टिकेकर 'मीनल' म्हणून रसिकांच्या मनात आहे. टेलिव्हिजननंतर स्वानंदीने सुमित राघवनसोबत 'एक शून्य तीन' या नाटकात झळकली होती. त्यानंतर आता उमेश कामतसोबत स्वानंदी पुन्हा रंगभूमीवर आली आहे.