स्वप्नील म्हणतोय 'बाई गं'ची रिलीज तारीख ठरली; मात्र कोण असेल बरं ही अभिनेत्री?

आता हे नेमकं काय प्रकरण आहे हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे की चित्रपटाच्या प्रमोशनची ही शक्कल आहे हे लवकरच समजेल ! स्वप्नील ने नुकतीच अजून एका चित्रपटाची घोषणा केली आहे 

Updated: Jun 6, 2024, 01:17 PM IST
स्वप्नील म्हणतोय 'बाई गं'ची रिलीज तारीख ठरली; मात्र कोण असेल बरं ही अभिनेत्री? title=

मुंबई : अभिनेता स्वप्नील जोशी हा कायम चर्चेत असतो तो त्याचा विविध भूमिका मुळे ! " नाच गं घुमा " च्या भरघोस यशानंतर आता तो पुन्हा एकदा अभिनय करण्यासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसापूर्वी निर्मात्याच्या भूमिकेत असणार स्वप्नील पुन्हा एकदा अभिनेता म्हणून सगळ्यांचं मनोरंजन करण्यासाठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

स्वप्नील " बाई गं " या चित्रपटात धनुष ही भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 12 जुलै रोजी रिलीज होणार असून स्वप्नीलने आज त्याचा सोशल मीडियावर एका अभिनेत्री सोबत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे पण नेमकी ही अभिनेत्री कोण? हे अजून समजलं नाही ! स्वप्नीलने शूट दरम्यान हा व्हिडिओ शूट केला असून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. प्रेक्षकांना यातली अभिनेत्री नक्की कोण? असा प्रश्न पडला आहे. स्वप्नील नव्या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणतो "बाई गं ची रिलीज तारीख ठरली आहे लवकरच प्रमोशन सुद्धा सुरू होईल ! पण तो पर्यंत चित्रपटातल्या 6 अभिनेत्री पैकी या व्हिडिओ मध्ये कोण अभिनेत्री आहे हे ओळखा ! " 

आता हे नेमकं काय प्रकरण आहे हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे की चित्रपटाच्या प्रमोशनची ही शक्कल आहे हे लवकरच समजेल ! स्वप्नील ने नुकतीच अजून एका चित्रपटाची घोषणा केली आहे आणि या फोटो मध्ये " दुनियादारी " चित्रपटाचे कलाकार दिसत आहेत. आता दुनियादारी 2 येणार का ? हा प्रश्न देखील प्रेक्षकांना पडला आहे. येणाऱ्या काळात स्वप्नील अनेक नवनवीन भूमिका करणार आहे हे पक्क आहे ! बाई गं नंतर स्वप्नील " जिलेबी " चित्रपटात सुद्धा दिसणार आहे. स्वप्नील ने 2024 ची सुरुवात निर्मिती पासून केली आणि नाच गं घुमा ने जगभरात प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आता प्रेक्षकांना बाई गं बद्दल उत्सुकता आहे यात शंका नाही!

आतापर्यंत कायम लव्हस्टोरी मध्ये लव्ह ट्रँगल होताना दिसायचा पण आता हे चित्र थोड बदलणार आहे. एक अभिनेता आणि सोबत तब्बल ६ नायिका ही संकल्पनाच या सिनेमाची उत्सुकता वाढविणारी आहे. हा चित्रपट  प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणार असून, यात हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी असणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दमदार कलाकारांची टीम ही या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू ठरणार आहे. यामध्ये स्वप्नील जोशी मुख्य अभिनेता असून यामध्ये तो वेगवेगळ्या वयोगटातील हरहुन्नरी सहा अभिनेत्रींसोबत दिसणार आहे. सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे , अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान अशा अफलातून अभिनेत्री 'बाई गं' चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. सोबतच सागर कारंडे देखील विशेष भूमिकेत असणार आहे.