Swara Bhaskar च्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचे 'ते' क्षण समोर!

Swara Bhaskar च्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचे फोटो तिनं तिच्या अकाऊंटवरून केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. सुरुवातीला स्वरा तिच्या विवाहामुळे चर्चेत आली होती. तिनं अचानक एक दिवस सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिच्या विवाहाची बातमी दिली होती. यावरून स्वराला अनेकांनी ट्रोल केले होते. 

Updated: Mar 4, 2023, 11:24 AM IST
Swara Bhaskar च्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचे 'ते' क्षण समोर! title=

Swara Bhaskar's Suhagrat Photo's Viral : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) ही लोकप्रिय कलाकारांपैकी आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वरा ही तिच्या विवाहामुळे चर्चेत होती. स्वरानं समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद अहमद (Swara Bhaskar and Fahad Ahmad) यांच्यासोबत विवाह केला. स्वरानं सोशल मीडियावर अचानक तिच्या आणि फहादच्या विवाहाचा एक फोटो शेअर करत ही गूड न्यूज चाहत्यांना दिली होती. त्यानंतर अनेकांनी तिची स्तुती केली तर अनेकांनी तिला ट्रोल केले. दरम्यान, त्यात आता स्वरानं तिच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचा फोटो शेअर केला आहे. स्वरानं शेअर केलेला हा फोटो पाहिल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला आहे. स्वरानं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

स्वरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत फुलांनी सजवलेला बेड दिसत आहे. बेडवर फुलांनी हार्ट शेप बनवला असून बेडच्या चारही बाजू सुंदर सजवल्या आहेत. हा फोटो शेअर करत स्वरानं कॅप्शन दिलं आहे की 'माझी लग्नाची पहिली रात्र ही फिल्मी असायला हवी यासाठी माझ्या आईनं प्रयत्न केले.' स्वरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरी वरून शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर तिच्या या फोटोवरून एक वेगळीच चर्चा देखील सुरु झाली आहे. एका नेटकऱ्यानं तिचा हा फोटो शेअर करत सवाल केला की 'फिल्मी सुहागरात असा काही प्रकार असतो?' (Swara Bhaskar's Suhagrat Photo)

दरम्यान, स्वराच्या या बेडला सजवण्यासाठी तिची आई इरा भास्कर यांनी होम डेकोर स्टायलिस्ट प्रियांका यादवला बोलावण्यात आलं होते. प्रियांका यादवनं देखील तिच्या स्टोरीवर बेडरूमचा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिनं लिहिलं होतं की 'याचं सगळं श्रेय हे स्वराची आई इरा भास्कर यांना जाते, कारण ही त्यांचीच आयड्या होती. मला हे खूप आवडलं आहे.' मात्र, त्यानंतर हा फोटो तिनं सोशल मीडियावरून डीलीट केला. स्वरानं देखील ही स्टोरी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली होती. 

आधीचं केलं होतं रिजिस्टर मॅरेज! (Swara Bhaskar Wedding)

स्वरानं विवाह करण्या आधीच म्हणजे 6 जानेवारी रोजी स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत रजिस्टर मॅरेज केलं. तर 16 फेब्रुवारी रोजी अचानक फोटो शेअर करत स्वरानं तिच्या विवाहाची बातमी देत चाहत्यांना धक्का दिला होता. तिचे कोर्टा बाहेरचे फोटो आणि विवाहानंतरचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या वेळी विवाहासाठी स्वरानं तिच्या आईची तिच्या लग्नातील साडी नेसली होती. इतकंच काय तर तिचेच लग्नातील दागिने सुद्धा परिधान केले होते.