'रानबाजार'आधीपासूनच तेजस्विनी पंडितच्या बोल्ड सीनची हवा; आघाडीच्या अभिनेत्यासोबत इंटिमेट Photo Viral

तिच्या बोल्ड भूमिकेची सध्या बरीच चर्चाही सुरु आहे. 

Updated: May 23, 2022, 03:18 PM IST
'रानबाजार'आधीपासूनच तेजस्विनी पंडितच्या बोल्ड सीनची हवा; आघाडीच्या अभिनेत्यासोबत इंटिमेट Photo Viral  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी आणि सहकलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या 'रानबाजार' या वेब सीरिजचे ट्रेलर, टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि त्यामागोमाग ही सीरिजही प्रेक्षकांच्या भेटीला आली. 

सीरिजचा टीझर आणि ट्रेलरच इतका लक्षवेधी होता की, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. अभिनेत्री तेजस्विनी पंडित या सीरिजच्या निमित्तानं पुन्हा एकदा आणखी एका चौकटीबाहेरच्या भूमिकेला न्याय देत प्रेक्षकांच्या भेटीला आली. (tejaswini pandit )

तिच्या बोल्ड भूमिकेची सध्या बरीच चर्चाही सुरु आहे. पण, जिथं एकाएकी मराठी कलागजगतातही बोल्ड दृश्यांना हाताळली जात असल्याचं म्हणत त्याला प्रेक्षकांकडूनही स्वीकृती मिळत आहे. पण, गेल्या दोन- तीन वर्षांचा आढावा घेतल्यास ही सुरुवात कधीच झाल्याचं कळून येतं. 

खुद्द तेजस्विनीबद्दलच म्हणावं, तर अभिनेता स्वप्नील जोशी याच्यासोबत 'समांतर- २'मध्ये की झळकली होती. त्या सीरिजमधील या दोघांच्याही इंटिमेट सीननं बऱ्याच चर्चा रंगवल्या. 

खुद्द तेजस्विनीनंही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये स्वप्निल आणि तिची जवळीक पाहता आली होती. अगदीच प्रक्षोभक नसला तरीही तितकाच बोलका असा फोटो तिनं त्यावेळी शेअर केला होता.