रियाकरता तापसीचं ट्विट, चाहत्यांनी केली बायकॉटची मागणी

काय आहे तापसीच्या ट्विटमध्ये?

Updated: Sep 1, 2020, 08:12 AM IST
रियाकरता तापसीचं ट्विट, चाहत्यांनी केली बायकॉटची मागणी

मुंबई : सुशांतच्या आत्महत्येनंतर हे प्रकरण सर्वाधिक चर्चेत आलं. या प्रकरणावरून बॉलिवूडमध्ये वेगवेगळी मत मांडली जात आहेत. अनेकांनी आपलं मौन सोडत प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली. मात्र युझर्सला कलाकारांनी रिया चक्रवर्तीची बाजू घेणं काही फार रुचलं नाही. याबाबत आता सोशल मीडियावरून तापसी पन्नूची क्लास घेण्यात आली. 

रियाच्या समर्थनात कलाकार सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. आता तापसी पन्नूचं ट्विट समोर आलं आहे. जे चाहत्यांना अजिबातच रुचलेलं नाही. तापसीने रियाच्या समर्थनात केलेलं ट्विट हे व्हायरल होत आहे. 

तापसीने अभिनेत्री लक्ष्मी मानचूच्या ट्विटला रिट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने लोकांना कायद्यावर विश्वास ठेवण्यास सांगितले आहे. मी सुशांत किंवा रियाला वैयक्तीक पातळीवर ओळखत नव्हते. पण एक माणूस म्हणून आपल्याला समजायला हवे एखादा व्यक्ती कायद्याने दोषी सिद्ध झाला नसतानाही आपण त्याला दोषी ठरवणे चुकीचे आहे या आशयाचे ट्विट करत तापसीने संताप व्यक्त केला आहे. 

तापसीच्या या ट्विटची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. तापसीला बायकॉट करण्याची मागणी देखील केली जात आहे. तापसीचे चाहते देखील तिच्या या ट्विटमुळे नाराज आहेत.