तारक मेहतामधील अभिनेत्रीने घातलेल्या ड्रेसने ओलांडली आपली मर्यादा, पाहा फोटो

टीव्हीचा प्रसिद्ध शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' शोच्या पात्रांमुळे नेहमीच चर्चेत असतो.

Updated: Sep 27, 2021, 10:54 PM IST
 तारक मेहतामधील अभिनेत्रीने घातलेल्या ड्रेसने ओलांडली आपली मर्यादा, पाहा फोटो

मुंबई : टीव्हीचा प्रसिद्ध शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' शोच्या पात्रांमुळे नेहमीच चर्चेत असतो. शोचं फॅन फॉलोइंग सुद्धा खूप चांगलं आहे. अभिनेत्री आराधना शर्मालाही शोमध्ये खूप पसंत केलं जात आहे.

शोमध्ये लेडी डिटेक्टिव्हची भूमिका साकारणारी आराधना सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. अलीकडेच आराधनाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे पाहून सगळेच तिच्यावर घायाळ होत आहेत. आराधनाने बिकिनी स्टाईल यलो टॉपसोबत प्रिंटेड शॉर्ट स्कर्ट घातला आहे. आराधना तिच्या सौंदर्याने आणि हॉटनेसने सगळ्यांना चकित करते.

या फोटोंमध्ये आराधना वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. याआधीही आराधनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती काळ्या बिकिनीमध्ये दिसत आहे. रिव्हिलिंग वेस्टर्न ड्रेसमधील तिच्या ग्लॅमरस स्टाईलने सर्वांची झोप उडाली आहे. तारक मेहताच्या या अभिनेत्रीच्या बोल्ड अवतारावरही लोक खूप प्रतिक्रिया देत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एकीकडे तिचं खूप कौतूक होतय तर, दुसरीकडे मात्र तिला ट्रोलिंगला सामोर जावं लागत आहे. एकाने कमेंट करत लिहीलं की, योग्य पद्धतीचे कपडे घाल, तर कोणी तिला टोमणे मारत म्हणतय की 'आणखी लहान कपडे नव्हते का?'.