तारक मेहतामधील या अभिनेत्याने साकरलं होतं 'चार्ली चॅप्लिन, ओळखलत का?

तारक मेहता का उल्टा चष्मा हा प्रत्येक घरातला आवडता शो आहे.

Updated: Sep 27, 2021, 09:56 PM IST
तारक मेहतामधील या अभिनेत्याने साकरलं होतं 'चार्ली चॅप्लिन, ओळखलत का?

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा हा प्रत्येक घरातला आवडता शो आहे. हा शो 13 वर्षांपासून लोकांचं मनोरंजन करत आहे. या शोच्या सगळ्या कलाकारांनी लोकांच्या हृदयात आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये एक मोठी स्टारकास्ट आहे आणि प्रत्येकजण सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

 चाहते दररोज सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल काहीतरी नवं-नवीन शोधतात. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी शोच्या एका अभिनेत्याचा जुने फोटो आणला आहे. आता तुम्ही त्यांना ओळखू शकता की नाही हे पाहणे महत्त्वाचं ठरेल.

शरद सांकलाचे 'चार्ली चॅप्लिन' हे पात्र लोकप्रिय झालं
'तारक मेहता का उल्टा चश्मा' या शोमधील एका पात्राने 'चार्ली चॅप्लिन' ची भूमिका अनेक वर्षांपासून साकारली आहे. हे दुसरे तिसरे कोणी नाही तर सगळ्यांचे लाडके अब्दुल म्हणजेच शरद संकला आहेत. शरद संकला शोच्या सुरुवातीच्या दिवसांपासून संबंधित आहे. शरदने अनेक बॉलिवूड चित्रपट आणि डेली सोपमध्येही काम केलं आहे. तो बराच काळ इंडस्ट्रीत आहे आणि लोकांना त्यांच कॅरेक्टरही खूप आवडतं. 

'बाजीगर'मध्येही साकारला होतं 'चार्ली चॅप्लिन' 
'तारक मेहता का उल्टा चश्मा' या शोमध्ये ते फॅन्सी ड्रेस कार्यक्रमात 'चार्ली चॅप्लिन' देखील बनले आहेत. एवढेच नाही तर शरद 'बाजीगर' चित्रपटात 'चार्ली चॅप्लिन' म्हणूनही दिसले होते.