Taarak Mehta Ka Ooltah Chashmah आता नवीन अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला.

ही  मालिका आता एका नवीन अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका आता ऍनीमेटेड सीरीजमध्ये (TMKOC Animated Version) बदली जाणार आहे.

Updated: Mar 24, 2021, 09:28 PM IST
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah आता नवीन अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला. title=

मुंबई : प्रेक्षकांच्या मनात भरलेली, अगदी लहानांपासून ते मोठ्यांच्या पसंतीची आणि घराघरात चालणारी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)ही  मालिका आता एका नवीन अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका आता ऍनीमेटेड सीरीजमध्ये (TMKOC Animated Version) बदली जाणार आहे.

एप्रिलमध्ये येणार सीरीज

तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)या मालिकेची ऍनीमेटेड सीरीज एप्रिलमध्ये 'सोनी सब' आणि 'सोनी याय' वर दाखवली जाणार आहे. यामध्ये लोकप्रिय पात्र जेठालाल, दया, बापूजी आणि टपू ऍड कंपनी हे ऍनीमेटेड कॅरेक्टरमध्ये तुमच्या समोर येणार आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

2008 पासून सुरु आहे मालिका

'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही सोनी सब चॅनलवर चालणारी लोकप्रिय मालिका आहे.   जुलै 2008 मध्ये प्रथमच प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि तेव्हापासून टीव्हीवर  सुरु आहे.  ही मालिका 'दुनिया ने ऊंधा चश्मा' या साप्ताहिक कॉलमवर आधारित आहे.

गोकुळधाम सोसायटीची कहाणी

ही मालिका गोकुळधाम नावाच्या एका सोसायटीत राहणार्‍या बर्‍याच कुटुंबांची कहानी सांगते, या सोसायटीत सर्व धर्म आणि पंथांची कुटुंबं एकत्र राहतात आणि त्यांच्या आयुष्यातील प्रश्न हसत हसत सोडवतात.

हे कलाकार सध्या मालिकेत आहेत

या मालिकेत दिलीप जोशी, दिशा वाकानी, शैलेश लोढा आणि मुनमुन दत्ता यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांनी लोकांना खास आकर्षित केले आहे.