TMOC : वडा पावाच्या नादात हरवला चेक, ज्यामुळे भिडेला बसला 35 हजारांचा फटका

तारक मेहता का उल्टा चष्मा मधील गोकुळीधाम सोसायटीमधील लोकांचा, एक त्रास संपला नाही की दुसरा सुरू होतो.

Updated: Oct 7, 2021, 08:52 PM IST
TMOC : वडा पावाच्या नादात हरवला चेक, ज्यामुळे भिडेला बसला 35 हजारांचा फटका title=

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा मधील गोकुळीधाम सोसायटीमधील लोकांचा, एक त्रास संपला नाही की दुसरा सुरू होतो. आता भिडे भाऊंच्या बाबतीतही असेच काहीसे घडले आहे. गणेश उत्सव सुरू झाला तेव्हाही भिडेच्या स्वप्नात आलेल्या गणपतीने त्यांना गोंधळात टाकले होते, ती कोंडी दूर झाली होती पण आता गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सचिव आत्माराम भिडे पुन्हा चिंतेत आहेत. कारण त्याचा चेक हरवला आणि त्याच्या खात्यातून 35 हजार रुपये चोरीला गेले आहे.

टप्पू सेनेनं गमावला चेक

गोकूळधाममधील टप्पू सेनेला बँक खात्यातून 35 हजार रुपये काढण्यासाठी भिडेने चेकवर सही करुन दिली आणि त्यांनी टप्पू सेनेला चेकची विशेष काळजी घेण्यास देखील सांगितले. जेणेकरून हा चेक कोणत्याही चुकीच्या हातात जाऊ नये. पण ज्याची त्याला भीती होती अखेर तेच घडले.

भिडे यांनी हा धनादेश सोनूला काळजीपूर्वक ठेवण्यासाठी दिला. पण वडा पाव खाण्यासाठी थांबलेल्या टप्पू सेनेच्या हातातून तो चेक हरवला. नंतर, जेव्हा टप्पू सेनेला हे कळले तेव्हा त्यांना धक्का बसला, त्यात जेव्हा भिडेच्या बँकेतून 35 हजार काढल्याचे त्यांना समजले, तेव्हा मात्र त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला.

शेवटी, भिडेच्या बँकेतुन कोणी पैसे काढले, तो चोर कोण, तो चोर पकडला जाईल का? हा सगळं तर आपल्याला या शोच्या पुढील भागात कळेच. अखेर ही गोकूळधाम सोसायटी आहे आणि त्यांन या सगळ्यातुन कसं मार्ग काढायचा हे चांगलच माहित आहे.