TMKOC | हे माँ माताजी! चक्क टप्पूच बबिताला डेट करतोय?

राज आणि मुनमुन या दोघांमध्ये 9 वर्षांचं अंतर आहे. मुनमुन राजपेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे. 

Updated: Sep 9, 2021, 06:56 PM IST
TMKOC | हे माँ माताजी! चक्क टप्पूच बबिताला डेट करतोय? title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही लोकप्रिय मालिका (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतंय. या मालिकेतील पात्र एकसेएक आहेत. सिनेमातील मुख्य पात्र असलेला जेठालालला (Jethalal) बबीता (Babita Ji) मनापासून आवडते. जेठालाल बबीताला पाहण्यासाठी तसेच तिच्याशी बोलण्यासाठी हवं ते करण्यासाठी तयार असतो. प्रेक्षकांनाही ऑन स्क्रीन बबिता आणि जेठालालची केमिस्ट्री आवडते. मात्र आता अशी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे तुम्हाला धक्काच बसेल. खऱ्याखुऱ्या आयुष्यात टप्पू म्हणजेच राज अनाडकट (Raj Anadkat) हा बबिताला लाईक करत असल्याचं म्हंटल जात आहे. (Taarak mehta ka Ooltah Chashmah fame munmun dutta and tapu raj anadkat dating)  

ई टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार, बबीताची भूमिका साकारत असलेली मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आणि टप्पूची भूमिका करणारा राज अनाडकट हे खऱ्याखुऱ्या आयुष्यात एकमेकांना लाईक करतात. राज हा अनेकदा मुनमुनच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करत असतो. यावरुन दोघ एकमेकांच्या किती जवळ आहेत, याबाबत समजतं. मात्र या वेबसाईटनुसार, दोघांमध्ये मैत्रीच्या पुढचं नातं असल्याचं म्हंटलं जातंय.   

वेबसाईटनुसार, तारक मेहता का उल्टा चष्मामधील प्रत्येक सदस्याला दोघांमध्ये काही तरी सुरु असल्याची माहिती आहे. इतकंच नाही, तर या दोघांच्या कुटुंबियांनाही याबाबतची माहिती आहे. हे दोघेही एकमेकांचा आदर करतात. 

दोघांमध्ये 9 वर्षांचं अंतर  

राज आणि मुनमुन या दोघांमध्ये 9 वर्षांचं अंतर आहे. मुनमुन राजपेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावरुन दोघांपैकी एकानेही काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या दोघांमध्ये नेमकं काय सुरुय, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.    

मुनमुनचं कमबॅक

दरम्यान मुनमुनने बऱ्याच काळानंतर शोमध्ये कमबॅक केलंय. मधल्या काळात मुनमुन गायब होती. मुनमुन मध्यंतरी एका व्हीडिओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यानंतर मुनमुनने सोशल मीडियावरुन जाहीररित्या माफी मागितली होती. यानंतर मुनमुन शोमध्ये दिसत नव्हती. त्यामुळे मुनमुनने हा शो सोडला की काय, असं चाहत्यांना वाटलं होतं. मात्र मुनमुनच्या कमबॅकमुळे आता चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.