'तारक मेहता' फेम निधी भानुशालीला का म्हणतायत, 'सोनू बन गई सेक्सी'

'तारक मेहता' फेम Nidhi Bhanushali ने दाखवला बोल्ड अवतार  

Updated: Dec 6, 2021, 10:57 AM IST
'तारक मेहता' फेम निधी भानुशालीला का म्हणतायत, 'सोनू बन गई सेक्सी'

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) टीव्ही मालिका गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. टप्पू सेनेची मस्ती, गोकूळ धाम सोसायटीमधील सर्वांची एकता आणि विनोद या सर्व गोष्टींमुळे मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 13 वर्षांच्या यशस्वी प्रवासा अनेक चढ-उतार आले. अनेकांनी मालिकेला रामराम ठोकला. त्यामधील एक म्हणजे मालिकेत सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी भानूशाली (Nidhi Bhanushali). 

मालिकेत भिडे सरांची मुलगी सोनू अर्थात निधी अत्यंत साधी, सभ्य दिसत होती. मात्र आता निधी प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते. निधी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील तिने काही फोटो शेअर केले आहेत. तिचा फोटो पाहून  लोकं 'सोनू बन गई सेक्सी' असं म्हणत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

निधी भानुशाली इंस्टाग्रामवर You Tube वरील एक कव्हर फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये ती समुद्र किनारी बसलेली दिसत आहे. निधीने गडबाउट प्रवाशांसाठी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. एवढंच नाही तर तिने डिसक्रिप्शनमध्ये व्हिडीओची लिंक दिली आहे. सध्या निधीची लेटेस्ट पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. 

काही दिवसांपूर्वी निधीने कुश शाह म्हणजेच गोलीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. याठिकाणी कुश शाहच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती आहे. त्याच्या हातात झाडू आहे जो त्याने खांद्यावर ठेवला आहे. सोबत निधी मागून गळ्यात हात घालून उभी आहे.