कपिलच्या गुगलीवर विकी कौशल बोल्ड; पण कतरिनाला हे आवडेल का ? 

विकी- कतरिनाच्या लग्नाचीच चर्चा 

Updated: Dec 6, 2021, 10:40 AM IST
कपिलच्या गुगलीवर विकी कौशल बोल्ड; पण कतरिनाला हे आवडेल का ? 

मुंबई : विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) लवकरच पती-पत्नीच्या नात्यात अडकणार आहेत. या दोघांच्या लग्नाचीच चर्चा सगळीकडे रंगली आहे. सध्या लग्नाची रेलचेल पाहता अनेकदा विकी आणि कतरिना एकमेकांच्या घरी जाताना दिसत आहे. असं असताना विकी कौशलचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या व्हिडीओत कपिलने अभिनेता विकी कौशलला असा प्रश्न विचारला आहे. ज्यामुळे विकी अगदी लाजून गेला आहे. कतरिनाचं नाव न घेता कपिलने विकीला त्याच्या आणि कतरिनाच्या नात्याबद्दल विचारलं आहे. (Katrina Kaif Vicky Kaushal Wedding: लग्नाआधी कतरिनाच्या सासऱ्यांनी 'अशी' जपली माणुसकी) 

कपिलच्या प्रश्नावर विकी कौशल चांगलाच लाजला 

हा व्हिडिओ कतरिना कैफच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला असून तो व्हायरल होत आहे. खरंतर हा व्हिडिओ आहे जेव्हा विकी त्याच्या 'भूत' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचला होता. शोमध्ये कपिल विकीला विचारतो, 'आजकाल जर मांजर रस्ता ओलांडली तर तुला काही हरकत नाही कारण तुला मांजरी (कॅट) आवडतात? कपिलने हा प्रश्न कतरिना कैफचं नाव न घेता विचारला होता. जो विकी कौशलला लगेच समजला. त्यावेळी दोघेही डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. कॅमेऱ्याला परवानगी नसतानाही विकी-कतरिनाच्या लग्नातला पहिला फोटो समोर

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @magical_katrina

विकीने दिलं अतिशय फिरवून उत्तर

कपिलचा हा प्रश्न ऐकून विकी काही वेळ शांत राहतो. त्याचवेळी प्रेक्षक हसू लागले, त्यामुळे विकीचा चेहरा लाजेने लाल झाला. या प्रश्नाचे त्याने थेट उत्तर दिले नाही, परंतु काही वेळ शांत राहिल्यानंतर तो हसतो आणि म्हणतो, 'हा एक भयानक प्रश्न होता'. विकी आणि कतरिना (Vicky - Katrina wedding) यांच्या लग्नाचे विधी 7 ते 10 डिसेंबर या कालावधीत होणार असल्याची माहिती आहे. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस किल्ल्यावर ९ डिसेंबर रोजी हे जोडपे सात फेरे घेतील.

लग्नात फक्त 120 पाहुणे 

विकी कौशल आणि कतरिना कैफ आपल्या लग्नाबद्दल अजून काहीच बोलले नाहीत. यांच्या लग्नात फक्त 120 पाहुणे सहभागी होणार आहेत.