मुंबईः एकेकाळी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या जुन्या सोनूला म्हणजेच निधी भानुशालीला तुम्ही सोशल मीडिया क्वीन म्हणू शकता. नुकतेच या अभिनेत्रीने तिचे असे काही फोटो शेअर केले आहेत तिचे चाहत्यांकडून अक्षरश: कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
निधी भानुशालीने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाची बिकिनी आणि काळ्या रंगाच्या शॉर्ट्समध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये निधीची स्टाइल खूपच किलर दिसत आहे. आणि चाहते तिच्या या फोटोंवर प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.
निधी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. शोच्या बबिताजी म्हणजेच मुनमुन दत्तानंतर, भानुशाली सोशल मीडियावर तिचा बोल्डनेस फ्लॉन्ट करत असते. झील मेहताने 'तारक मेहता...'शो सोडल्यानंतर निधी भानुशालीने आत्माराम तुकाराम भिडे आणि माधवी यांच्या मुलीची सोनूची भूमिका साकारली होती.
निधी 6 वर्षे शोमध्ये दिसली, पण अभ्यासामुळे ती 2019 मध्ये सोडली. सध्या पलक सिधवानी सोनूची भूमिका साकारताना दिसत आहे. निधी भानुशाली तिच्या स्टाइल आणि बोल्ड फोटोंसाठी प्रसिद्ध आहे.
सोनू उर्फ निधी देखील खूप सुंदर आहे, परंतु आजकाल तिच्या सौंदर्यापेक्षा लोकांचे लक्ष तिच्या फोटोमध्ये दिसणार्या मुलाकडे जास्त आहे. निधीने आपल्या एका मुलाखतीत या मिस्ट्री बॉयवर भाष्य केलं होतं. तिने सांगितले की, सोबत दिसणारा मिस्ट्री बॉय ऋषी अरोरा आहे.