धनंजय मुंडेंवर कारवाई करणार? अजित पवार यांचा मोठा निर्णय; संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांचा तपास अत्यंत वेगाने

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 6, 2025, 08:31 PM IST
धनंजय मुंडेंवर कारवाई करणार? अजित पवार यांचा मोठा निर्णय; संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांचा तपास अत्यंत वेगाने title=

Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे कनेक्शन असल्याचा आरोप केला जात आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव आणला जात आहे. अशातच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीबाबत अजित पवार यांनी भूमिका देखील जाहीर केली आहे.  संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, आरोपींवर 302 चा गुन्हा दाखल करा अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांची राज्यपालांकडे केली आहे. 

धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची त्यांच्या दालनात भेट घेतली. दोघांमध्ये बंद दाराआड तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी बीड प्रकरणाबाबत धनंजय मुंडेंनी अजित पवारांसमोर बाजू मांडली असून विरोधकांकडून सुरु असलेल्या आरोपांवर त्यांनी खुलासा केल्याची माहिती आहे. यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. 

बीड प्रकरणात जोपर्यंत पुरावा समोर येत नाही  तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.  न्यायालयीन चौकशी, एसआयटी आणि सीआयडी चौकशी होईपर्यंत कारवाई नाही.  तिन्ही चौकशी मध्ये जो दोषी असेल, त्यावर कारवाई करणार असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धनंजय मुंडेंसंदर्भात मांडली आहे. 

मंत्री संजय शिरसाट यांनी बीड हत्याप्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केलीय..संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांचा अत्यंत वेगाने तपास सुरु आहे..  त्यामुळे अनेक आरोपींना पकडण्यात आलेय. तसेच याप्रकरणात मुख्यमंत्री यांनी देखील गांभीर्याने दखल देत आहे.अस शिरसाट यांनी सांगितलेय..