'Taarak Mehta...' मधील भिडेच्या मुलीचा बिकिनी फोटोशूटनंतर नवा अवतार

प्रेक्षकांनी ही मुले लहानपणापासून मोठी झालेली या मालिकेत पाहिली आहेत.

Updated: Oct 22, 2021, 01:26 PM IST
'Taarak Mehta...' मधील भिडेच्या मुलीचा बिकिनी फोटोशूटनंतर नवा अवतार

मुंबई : लोकांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या हिट शोच्या बालकलाकारांवर खूप प्रेम आहे. प्रेक्षकांनी ही मुले लहानपणापासून मोठी झालेली या मालिकेत पाहिली आहेत. या मालिकेत अभिनेत्री निधी भानुशालीने सुरुवातीला 'सोनू' ची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता नव्या सोनूची एन्ट्री झाली आहे. पण या जुन्या सोनूची आजही तितकीच चर्चा पाहायला मिळते.

अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या डेली लाईफमधील अपडेट चाहत्यांसोबत शेअर करते. आता निधीचा एक फोटो व्हायरल होत आहे. लोकांना तिचा अंदाज खूप आवडतो आहे.

निधी भानुशालीचा नवा अवतार 

 निधी भानुशालीला तिच्या बोल्डनेससाठी लोक ओळखतात, पण काही लोकांना माहित आहे की अभिनेत्री खूप टॅलेंटेड आहे. अभिनय आणि प्रवासाव्यतिरिक्त, तिला अनेक क्षेत्रात रस आहे. अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत, ज्यामुळे अभिनेत्रीचे न पाहिलेले कौशल्य समोर आले आहे. हे फोटो पाहिल्यानंतर निधी भानुशाली इतकी टॅलेंटेड आहे हे दिसून येतंय.

निधी भानुशाली एक अद्भुत नृत्यांगना 

निधी भानुशाली अभिनयाबरोबरच नृत्य आणि गायनातही तज्ज्ञ आहे. अभिनेत्रीच्या क्लासिक भरतनाट्यम नृत्याची छायाचित्रे व्हायरल होत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

यासोबतच अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात ती मधुर आवाजात एक गाणे गाताना दिसत आहे. निधी भानुशालीने गेल्या वर्षी भरतनाट्यम नृत्याचे फोटो शेअर केले होते.

यामध्ये ती बॉर्डर असलेली पिवळी साडी परिधान करताना दिसत आहे. यासोबत तिने पारंपारिक लूक केला आहे. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.