आता प्रतीक्षा संपली...Taarak Mehta मालिकेच्या टीमला भेटली नवीन दया बेन?

ज्यात ती दया बेनचं पात्र साकारत आहे.

Updated: Feb 25, 2022, 07:30 PM IST
 आता प्रतीक्षा संपली...Taarak Mehta मालिकेच्या टीमला भेटली नवीन दया बेन? title=

मुंबई : गेल्या 13 वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' लोकांचे भरपूर मनोरंजन करत आहे, दयाबेन अनेक वर्षांपासून या शोमधून गायब आहे, मात्र असे असूनही या शोची लोकप्रियता अजिबात कमी झालेला नाही.

पण चाहते अजूनही दया बेनची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण ही प्रतीक्षा आता संपणार आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा हा प्रत्येक घराघरात पसंत केला जाणारा शो आहे. हा शो अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे.

या शोमधील सर्व कलाकारांनी लोकांच्या हृदयात आपली खास जागा निर्माण केली आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये सर्वात मोठी स्टारकास्ट आहे, पण जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी आणि दया बेन म्हणजेचदिशा वकानी यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

कित्येक वर्ष दया भाभीची भूमिका करणारी दिशा वकानी आता या शोचा भाग नाही. त्या शोमधून बाहेर पडल्यानंतर शोच्या फॅन फॉलोइंगवर देखील याचा चांगलाच परिणाम झाला.

शो आवडणारे चाहते दोन गटात विभागले गेले आहेत. एक गट असा आहे जो अजूनही शो पाहत आहे, तर दुसरा गट दया बेन परत येण्याची वाट पाहत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता नवीन दयाबेन समोर आली आहे, हे ऐकून अनेकांना धक्का बसला असले. टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा नेहमीच तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. 'गम है किसी के प्यार में' या टीव्ही सीरियलमध्ये ऐश्वर्या शर्मा पाखीची भूमिका साकारत आहे.

आता ती दया भाभीची भूमिका साकारण्यासाठीही सज्ज दिसत आहे. तिने दया भाभी आणि जेठालाल यांच्यातील संवादाचा एक रिल व्हिडिओ शूट केला आहे.ज्यात ती दया बेनचं पात्र साकारत आहे.

या व्हिडिओमध्ये ऐश्वर्यासोबत तिचा पती आणि अभिनेता नील भट्ट जेठालालच्या भूमिकेत दिसत आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहिल्यानंतर ही अभिनेत्री नवीन दया बेन म्हणून शोमध्ये येणार का? असा सवाल देखील विचारला जात आहे.