मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेत बबिता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) ही सध्या जर्मनीत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेली होती. मात्र, सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेली मुनमुन दत्ताचा तिथे अपघात झाला आहे. याविषयी मुनमुननं तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. मुनमुननं ती घरी परतल्याचेही सांगितले आहे.
हेही वाचा : कॉन्सर्टनंतर Shreya Ghoshal चा आवाजच गेला; बापरे हे असंही होतं? गायिका प्रचंड भावूक
मुनमुननं 21 नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत तिच्या अपघाताविषयी माहिती दिली आहे. अभिनेत्रीनं लिहिलं की, 'जर्मनीमध्ये माझा अपघात झाला. माझ्या डाव्या गुडघ्याला खूप दुखापत झाली आहे. मला माझा प्रवास कमी करून घरी परतायचे आहे. मुनमुननं पोस्टच्या शेवटी तुटलेल्या हार्टची इमोजीही वापरले आहे. अपघातामुळे तिला तिची युरोप ट्रीप लवकर संपवावी लागली, त्यामुळे ती दु:खी आहे. मुनमुननं जेव्हा पासून तिच्या दुखापतीविषयी सांगितलं तेव्हापासून चाहते तिला लवकरात लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा देत आहेत.
दरम्यान, बबिता जीची भूमिका साकारणारी मुनमुन जर्मनीपूर्वी स्वित्झर्लंडमध्ये फिरायला गेली होती. तिला जर्मनीला जाऊन दोनच दिवस झाले होते. मुनमुननं स्वित्झर्लंडमधील खूप फोटो शेअर केले आहेत. पण दुर्दैवानं तिचा अपघात झाला आणि आता तिला तिची ट्रीप अर्धवट सोडून घरी परतावे लागले. मुनमुन कामातून ब्रेक घेऊन युरोपच्या दौऱ्यावर गेली.