मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taaraka Mehta Ka Ooltah Chashmah) हा प्रत्येक घरातला आवडता कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम बर्याच वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या शोच्या सर्व कलाकारांनी लोकांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण केले आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मोठा स्टारकास्ट आहे. परंतु जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी (Dilip Joshi) आणि दया बेन (Daya Bhabhi) अर्थात दिशा वाकानी (Disha Vakani) यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. मात्र, दया भाभीची भूमिका साकारणारी दिशा वाकानी आता या शोचा भाग नाही. शो सोडल्यानंतर शोच्या फॅन फॉलॉइंगवर मोठा परिणाम झाला. काहीनी हा शो पाहणे सोडून दिले आहे. तर काही जण दया भाभीची कार्यक्रमात कधी एंट्री होणार याची वाट पाहत आहेत. अखेर नवीन दया भाभी सापडली आहे. आता या नव्या दया भाभीची चर्चा सोशल मीडियावरच होत आहे. मात्र, प्रत्यक्षात शोमध्ये कधी दिसणार हा प्रश्नच आहे.
दिशा वाकानी (Disha Vakani) हिने ही मालिका सोडल्यानंतर अनेक दिवसांपासून 'तारक मेहता का उल्टा चश्मा'त हे पात्र गायब होते. ती माहेरी गेली आहे, असे जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांच्या तोंडून ऐकायला मिळत होते. आता तसे होणार नाही. नवीन दया भाभी मिळाली आहे. आपणास नक्कीच आश्चर्य वाटेल. कारण नवीन दया भाभी जी दिशा वाकाणीशी मिळती जुळती दिसून येत आहे. एक व्हिडिओ आजकाल खूप व्हायरल होत आहे.या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्री आणि यु ट्यूबर गरिमा गोयल (Garima Goel) दिशा वाकानीची प्रसिद्ध भूमिका दया भाभीच्या लूकमध्ये दिसली आहे. गरिमा दया बेनच्या गेटअपमध्ये पूर्णपणे दिसली आहे. साडी नेसण्यापासून स्टाईल-मेकअपपर्यंत तिने दया भाभी सारखी सर्व कामे केली आहेत.
आता प्रश्न आहे, निर्मात्यांना खरोखरच नवीन दया भाभी (Disha Vakani) सापडली आहे का? गरिमा गोयल (Garima Goel) ही दया भाभीची जागा घेईल का आणि जेठालाल (Dilip Joshi) यांच्या पत्नीच्या रूपात दिसतील, तर मग उत्तर नाही आहे. गरिमा नक्कीच व्हिडिओमध्ये दया भाभी म्हणून पाहिली गेली आहे, परंतु केवळ तिच्या यूट्यूब ब्लॉगसाठी. तिने दया भाभीचा गेटअप तिच्या एका व्हीब्लॉग्जसाठी परिधान केला आणि संपूर्ण दिवस दया भाभीप्रमाणे घालवला. जेवण करण्यापासून ते उठणे-बसण्याबाबतची स्टाईल कॉपी केली होती. गरिमाने स्वतःचा पाळीव कुत्रा जेठालाल म्हणून बनविलाहोता, जो खूपच मजेशीर दिसत होता.
दिशा वाकाणीला (Disha Vakani) असे पराभूत करणे इतके सोपे नाही, गरिमा गोयलचे (Garima Goel) प्रयत्न वाईट नव्हते, पण दया भाभीची एनर्जी नक्कीच मिसिंग होती. आता 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा व्हिडिओ नक्कीच ऑडिशन म्हणून पाहू शकतात. गरिमाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लूकची एक झलकही शेअर केली आहे. गरिमा गोयल ही यु ट्यूबबर तसेच एक अभिनेत्री आहे, ती बर्याच डेली सोपमध्ये काम करताना दिसली आहे. लोक तिचा यूट्यूब ब्लॉग्ज पाहायला पसंत करतात.