...म्हणून ताहिरा - आयुष्मानच्या वैवाहिक जीवनात घटस्फोटाचं वादळ

ताहिराची कॅन्सरशी झुंज यशस्वी 

Updated: Jan 21, 2020, 11:41 AM IST
...म्हणून ताहिरा - आयुष्मानच्या वैवाहिक जीवनात घटस्फोटाचं वादळ title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना ज्या सिनेमावर बोट ठेवेल त्या सिनेमाचं सोनं होताना पाहत आहोत. आयुष्मान खुरानाचे सगळेच सिनेमे सुपरहिट ठरत आहेत. यामुळे त्याचा आगामी सिनेमा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' बद्दल प्रेक्षकांना भरपूर उत्सुकता आहे. आज आयुष्मान जे काही आहे त्यामध्ये पत्नी ताहिरा कश्यपचा खूप मोठा हात आहे. पण एकेकाळी या दोघांच्या नात्यात मोठी दरी निर्माण झाली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Today is my day! Wish you all a happy #worldcancerday and hope each one of us celebrates this day in an embracing way. That we remove any stigma or taboo associated with it. That we spread awareness about it and that we have self love no matter what. I truly embrace all my scars as they are my badges of honour. There is nothing known as perfect. Happiness lies in truly accepting yourself. This was a tough one for me. But this picture was my decision as I want to celebrate not the disease but the spirit with which I endured. To quote my mentor, Diasaku Ikeda, “Leading an undefeated life is eternal victory. Not being defeated, never giving up, is actually a greater victory than winning, not being defeated means having the courage to rise to the challenge. However many times we’re knocked down, the important thing is we keep getting up and taking one step-even a half step- forward” #worldcancerday #breastcancerawareness #breastcancerwarrior #turningkarmaintomission #boddhisatva Thanks @atulkasbekar for this one

A post shared by tahirakashyapkhurrana (@tahirakashyap) on

ताहिरा कश्यपचा आज वाढदिवस. ताहिरा कश्यपने कॅन्सरशी दोन हात केले आहेत. तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला असून केमो थेरपीमुळे तिचे केस गेले आहेत. ही ती वेळ होती जेव्हा आयुष्मान करिअरच्या एका वेगळ्या उंचीवर होता आणि ताहिराच्या जीवनात एवढी मोठी घटना घडत होती. मात्र दोघांनी एकमेकांना खूप चांगली साध दिली. आता ताहिरीने कॅन्सरची झुंज जिंकली असून आयुष्मान बॉलिवूडमध्ये नंबर वनवर आहे. 

आयुष्मानला ताहिराशी वयाच्या 16 व्या वर्षीच प्रेम झालं होतं. 12 वर्षांच्या रिलेशनशिपनंर दोघांनी 2008 मध्ये लग्न केलं. ताहिराने एका मुलाखतीत मात्र धक्कादायक माहिती दिली होती. ताहिराने आयुष्मानसोबतचं नातं तोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आयुष्मान ऑनस्क्रीन किस करायचा त्याचा त्रास होत होता. यावेळी मी गरोदर होती. अशावेळी हार्मोन्समध्ये बदल होत असतात. याचा परिणाम माझ्यावर झाला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Last night witnessed the most beautiful reception of the two most beautiful humble beings

A post shared by tahirakashyapkhurrana (@tahirakashyap) on

पुढे ताहिरा सांगते की,'आयुष्मानकडे मला ऐकून घ्यायला वेळ नव्हता तर माझ्याकडे त्याला ऐकून घ्यायचं धैर्य नव्हतं. आम्ही एकत्र असून पण एकमेकांपासून लांब होतो. त्याला असं वाटतं होतं की या गोष्टींच मी वाईट वाटून घेणार नाही. मी त्याची कला समजून घ्यायला हवी.'

एवढंच नव्हे तर ताहिरा कॅन्सरशी झुंज देत होती. अशावेळी तिला अनेकदा वाटलं की,आयुष्मानची साथ सोडून द्यावी. त्याप्रमाणे तिने मनाची तयारी देखील केली. पण आयुष्मानने तिची साथ कधीच सोडली नाही. त्या दोघांनी मिळून कॅन्सरशी संघर्ष केला.