प्रेम प्रकरण बेतलं अभिनेत्रीच्या जीवावर, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

प्रेम प्रकरणामुळे अभिनेत्रीने स्वतःला संपवलं, पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये...   

Updated: Sep 19, 2022, 12:11 PM IST
प्रेम प्रकरण बेतलं अभिनेत्रीच्या जीवावर, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह  title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वात आत्महत्येचं सत्र सुरू आहे. वेग-वेगळ्या कारणांमुळे अनेक कलाकारांना स्वतःला संपवलं. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने प्रेम प्रकरणामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. तामिळ चित्रपटसृष्टीतील आणखी एका अभिनेत्रीच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला असून, उभरती अभिनेत्री पॉलीन जेसिका उर्फ ​​दीपा तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली आहे. 

दिपाच्या आत्महत्येमागे प्रेमप्रकरण हे प्रथमदर्शनी कारण असल्याचा पोलिसांचं मत आहे. तमिळ अभिनेत्री पॉलीन जेसिका तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली आहे. पॉलिनला दिपा या नावानेही ओळखले जात होते, अभिनेत्रीच्या आकस्मिक मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे.

पोलिसांना मिळाली सुसाईड नोट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाइड नोट सापडली आहे, ज्यामध्ये दिपाने आयुष्यभर कोणावर तरी प्रेम करत राहील... असं लिहिलं आहे.  तर तिच्या मृत्यूचं कोणतंही कारण समोर आलेलं नाही. दिपाच्या चिठ्ठीत कोणाचंही नाव लिहिलेलं नाही. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला आहे.

दिपाचे सिनेमे...
दिपाने अनेक तामिळ सिनेमामध्ये सहायक अभिनेत्री म्हणून काम केलं होतं. फार कमी कालावधीत तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली होती. 

तिच्या छोट्या छोट्या भूमिकांमधून तिने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले. सध्या ती विशाल स्टारर 'थुप्परिवलन' सिनेमात सेवाकुराच्या भूमिकेत होती. नासिर स्टारर 'वैदा'  सिनेमात दिपा मुख्य भूमिकेत झळकली होती.