'प्रत्येक मराठ्यामध्ये दडला आहे लाख मराठा'

'तान्हाजी'चा मराठी टीझर प्रदर्शित   

Updated: Dec 9, 2019, 06:20 PM IST
'प्रत्येक मराठ्यामध्ये दडला आहे लाख मराठा'

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याची कथा रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वीर तान्हाजी मालुसरे यांची व्यक्तीरेखा अभिनेता अजय देवगन साकारणार आहे. 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' चित्रपटाचा मराठी टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. १२ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये स्वराज्यापेक्षा जास्त प्रिय महाराजांसाठी काहिच नसल्याचं दाखवण्यात आलं आहे.

'प्रत्येक मराठ्यात दडला आहे लाख मराठा 'चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याची शौर्य कथा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 

'तान्हाजी' हा अजयच्या अभिनय कारकिर्दीतील शंभरावा चित्रपट ठरत आहे. कलाविश्वात अनेक वर्षे काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या अभिनेत्याचा शंभरावा चित्रपट हा त्याच्यालेखीसुद्धा तितकाच खास आहे. 

'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' चित्रपटात अजयसोबत पत्नी अभिनेत्री कजोल देखील झळकणार आहे. त्याचप्रमाणे चित्रपटात अभिनेता सैफ अली खान, शरद केळकर, आणि पंकज त्रिपाठी देखील झळकणार आहेत. 

ऐतिहासिक कथेवर आधारलेला 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' १० जानेवारी २०२० रोजी रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.