सुपरहिट गाण्यावर 'तारक मेहता...' फेम बबीताचा ‘LAZY’ डान्स

'Lazy' डान्सने बबिताने जिंकलं चाहत्यांचं मन, पाहा तो भन्नाट डान्स व्हिडीओ

Updated: Nov 24, 2021, 01:30 PM IST
सुपरहिट गाण्यावर 'तारक मेहता...' फेम  बबीताचा ‘LAZY’ डान्स title=

मुंबई : गेल्या 13 वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा प्रस्थापित केली आहे. मालिकेतील सर्वात प्रसिद्ध आणि आवडतीचं पात्र म्हणजे जेठालाल आणि बबीता जी. बबीता अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता. मुनमुन गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सक्रिय आहे. आता देखील तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  व्हिडीओमध्ये मुनमुन दत्ताने एका गाण्यावर ठेका ठरला आहे. 

अभिनेत्रीने बादशाहच्या 'जुगनू'वर जबरदस्त डान्स मूव्ह दाखवल्या आणि आता ती पुन्हा एकदा तिच्या डान्सने सर्वांची मनं जिंकत आहे. अभिनेत्री विद्या बालनच्या 'घनचक्कर' चित्रपटातील 'लेझी लैड सैंया' या गाण्यावर मुनमुन डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये मुनमुन वेस्टर्न आउटफिटमध्ये आहे आणि प्रिंटेड ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओ शेअर करताना मुनमुन दत्ताने कॅप्शनद्वारे सांगितले आहे की, ती डान्स मूव्हज शिकण्याचा प्रयत्न करत आहे. मुनमुन दत्ताने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले- 'हा सुंदर डान्स सिक्वेन्स शिकण्याचा प्रयत्न करत आहे. या सुंदर कोरिओग्राफीसाठी सलाम... नेहमीप्रमाणेच मी नेहमी ट्रेंडमध्ये उशीरा येतो.. मला वाटते की मी खरोखर 'आळशी' आहे.' सध्या मुनमुनचा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.