जेठालालची मुलगी कोणासोबत अडकणार लग्न बंधनात? हा नवरदेव नक्की आहे तरी कोण?

नियतीचा होणारा नवरा कोण आहे? हे दोघे कसे भेटले? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Updated: Dec 9, 2021, 04:44 PM IST
जेठालालची मुलगी कोणासोबत अडकणार लग्न बंधनात? हा नवरदेव नक्की आहे तरी कोण?

मुंबई : सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिलीप जोशी यांची मुलगी नियती जोशी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. दिलीप जोशी आपल्या मुलीच्या लग्नात गुंतले आहेत. या लग्नाला अनेक बॉलिवूड स्टार्सही हजेरी लावू शकतात. रिपोर्टनुसार, नियतीचं लग्न आज नाशिकमध्ये होणार आहे. तर लग्नाचं भव्य रिसेप्शन मुंबईतील ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. दिलीप जोशीने तारक मेहताच्या संपूर्ण टीमला लग्नासाठी आमंत्रित केले आहे.

अभिनेत्याने दिशा वाकाणीलाही आमंत्रित केले आहे. दिशाने निमंत्रण स्वीकारले असले तरी ती लग्नाला येणार की नाही हे अद्याप काही कळालेलं नाही.

नियतीच्या पतीचे नाव यशोवर्धन मिश्रा आहे, जो लोकप्रिय लेखक अशोक मिश्रा यांचा मुलगा आहे. नियती आणि यशोवर्धन कॉलेजच्या काळापासून एकमेकांना ओळखतात. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. यशोवर्धन हा वडिलांप्रमाणेच दिग्दर्शक आणि लेखक आहेत.

यशोवर्धन आणि नियती यांचे गेल्या वर्षी लग्न होणार होते, पण लॉकडाऊनमुळे त्यांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली. दिलीप जोशी यांच्या पत्नीचे नाव जयमाला आहे. ती लाइमलाइटपासून दूर राहते. दिलीप जोशी यांना ऋत्विक जोशी नावाचा मुलगाही आहे.

दिलीप जोशींबद्दल बोलायचं तर ते अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहेत. मात्र जेठालाल यांच्यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखेला घरोघरी ओळख मिळाली. एका सर्वेक्षणानुसार, तारक मेहता का उल्टा चष्मा हा सर्वाधिक पाहिला जाणारा शो आहे. शोची लोकप्रियता इतकी आहे की त्यावर आधारित एक अॅनिमेटेड शो देखील आहे.

या शोच्या व्यक्तिरेखेवर अनेक मीम्स आणि जीआयएफ बनवण्यात आले आहेत. दिलीप जोशी अनेकदा आपल्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतो. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. दिलीप जोशी नुकतेच केबीसीमध्ये दिसला होता.