Vicky- katrina च्या लग्नाचा हा खर्च कोण किती टक्के उचलतंय पाहा

जाणून बसेल धक्का   

Updated: Dec 9, 2021, 03:48 PM IST
Vicky- katrina च्या लग्नाचा हा खर्च कोण किती टक्के उचलतंय पाहा
छाया सौजन्य- सोशल मीडिया

जयपूर : अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेता विकी कौशल यानं  कतरिनाचा डेट करणं आणि आता थेट तिच्याशी लग्न करणं ही बाब अनेकांनाच अद्यापही थक्क करत आहे. अगदी कतरिना - विकीच्या लग्नाचा दिवस उजाडला तरीही हे आश्चर्यचकित होणं काही कमी झालेलं नाही. 

विकी आणि कॅटच्या लग्नाशी संबंधीत नवनवीन बातम्या दर दिवशी चाहत्यांना थक्क करत आहेत. (Vicky kaushal katrina kaif)

आता त्यांच्या लग्नसोहळ्याचा काही मिनिटांपूर्वीच समोर आलेल्या वृत्तानुसार, लग्नाच्या एकूण खर्चापैकी 75 टक्के खर्चाची जबाबदारी कतरिनानं तिच्यावर घेतली आहे. 

उरलेल्या 25 टक्के खर्चाचा भार हा विकीच्या खांद्यावर असणार आहे. लग्नातील सर्व महत्त्वाचे निर्णय हे कतरिनाच घेत आहे. 

लग्नसोहळ्यासाठीचं ठिकाण मोफत... 
सूत्रांच्या माहितीनुसार सवाई माधोपूरमध्ये सिक्स सेंन्सेस फोर्टमध्ये विकी आणि कतरिनाला ही जागा मोफत देण्यात आली आहे. 

सदर प्रॉपर्टीवर अनेक हाय प्रोफाईल कार्यक्रम येत्या काळातक व्हावेत यासाठी ही एक प्रकारची जाहिरातच म्हणा. 

लग्नात खर्चल्या जाणाऱ्या मोठ्या रकमेचे चेक हे कतरिना देत आहे. प्रवास, पाहुण्यांचा खर्च, कपडे, सजावट, पत्रिका, सुरक्षा व्यवस्था आणि इतरही मोठे खर्च ही अभिनेत्री सांभाळत आहे. 

कमाई आणि अनुभवाच्या बाबतीत कतरिना विकीच्या पुढे आहे. त्यामुळे इथं तिच्या शब्दाला जास्त वजन मिळताना दिसत आहे.