Tarak Mehta मधील बबिताच्या फोन वॉलपेपरवरील 'तो' फोटो होतोय व्हायरल !

ज्यात बबिता अर्थात मुनमुन दत्ताने ही सहभाग घेतला आहे. 

Updated: Nov 24, 2021, 05:46 PM IST
 Tarak Mehta मधील बबिताच्या फोन वॉलपेपरवरील 'तो' फोटो होतोय व्हायरल ! title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही मालिकेत बबिताची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ताची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. शोमधील स्टायलिश व्यक्तिरेखेमुळे मुनमुन सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांचे हृदय तोडत नाही आणि अनेकदा तिचे आश्चर्यकारक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. अलीकडेच तिने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

ज्यात तिच्या फोनचा वॉलपेपरवर रिवील झाला आहे. बबिताने वॉलपेपरवर कोणता फोटो ठेवला असेल याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये नक्कीच उत्सुकता आहे. त्यात नवा ट्रेण्ड आल्याने बबिताने आपला वॉलपेपरचा तो व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

सोशल मीडियावर सध्या वॉलपेपर थीमचा व्हिडिओ तयार करण्याचा ट्रेण्ड आला आहे. ज्यात बबिता अर्थात मुनमुन दत्ताने ही सहभाग घेतला आहे. तिने आपला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिच्या या व्हिडिओला लाखो लाईक्स मिळाले आहेत.

त्यामुळे बबिता ही सोशल मीडियावरील ट्रेण्ड फॉलो करत असल्याचं दिसत आहे.