दया बेनच्या आयुष्यात अवतरली छोटी परी...

तारक मेहता का उल्टा चष्मा मधील दया बेन म्हणजे अभिनेत्री दिशा वकानी गरोदर असल्यामुळे शो मधून खूप काळ दूर होती. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 30, 2017, 05:29 PM IST
दया बेनच्या आयुष्यात अवतरली छोटी परी...

नवी दिल्ली : तारक मेहता का उल्टा चष्मा मधील दया बेन म्हणजे अभिनेत्री दिशा वकानी गरोदर असल्यामुळे शो मधून खूप काळ दूर होती. तिच्या आयुष्यात आता एक छोटी परी अवतरली आहे. दिशाने हीरानंदानी हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला. 
गेल्याच वर्षी दिशाने चार्टेड अकाऊंटट मयूर पांड्या सोबत विवाह केला होता. हे त्या दोघांचे पहिलेच बाळ आहे. 

अफवा आणि सत्य

गरोदरपणामुळे शो पासून लांब असलेल्या दिशाबद्दल काही अफवा पसरल्या होत्या. तिला शो मधून काढण्यात आले, असे बोलले जात होते. परंतु, कालांतराने या अफवा दूर झाल्या आणि सत्य समोर आले. 

दिशाचा प्रवास

दिशाने टीव्ही शो खिचडी मध्ये पाहुणे कलाकार म्हणून उपस्थिती लावली होती. मात्र तारक मेहता का उल्टा चष्मा मधील दया बेनने अगदी सर्वांच्या मनावर राज्य केले. याव्यतिरीक्त ती 'देवदास' 'जोधा-अकबर' आणि 'लव स्टोरी 2050' या चित्रपटात देखील झळकली होती.